मणिपूर राज्यातील हिंसाचाराची झळ सोसणाऱ्या आमच्या ख्रिश्चन बांधवांबद्दल आम्हाला चिंता लागून राहिली असून त्यांच्या जीवितेच्या सुरक्षेसह तेथील सर्वसामान्य जीवनाचे, उध्वस्त घरे, शाळा, हॉस्पिटल्स, अनाथालय आणि चर्च सारख्या प्रार्थना स्थळांचे पुनर्वसन केले जावे, अशी मागणी बेळगावच्या युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्यूमन राइट्स आणि बेळगाव पास्टर्स अँड ख्रिश्चन लीडर्स असोसिएशनने राष्ट्रपती द्रौपदी मुरूम यांच्याकडे केली आहे.
युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्यूमन राइट्स आणि बेळगाव पास्टर्स अँड ख्रिश्चन लीडर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज सोमवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन राष्ट्रपतींकडे धाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. रत्नांची भूमी मणिपूर राज्यात मानवी हक्क पायदळी तुडवून जीवित हानीसह मालमत्तेचे प्रचंड नुकसान करणारा जो हिंसाचार झाला त्याबद्दल तुम्ही ज्ञात आहात.
सदर हिंसाचाराचा झळ सोसणाऱ्या आमच्या तेथील ख्रिश्चन बांधवांबद्दल आम्ही युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्यूमन राइट्स आणि बेळगाव पास्टर्स अँड ख्रिश्चन लीडर्स असोसिएशन अत्यंत चिंतित आहोत. मणिपूर मधील मिआयटीई कुकी-झो येथे गेल्या 7 जुलैला झालेल्या जीवित आणि वित्तहानीची माहिती आम्ही देत आहोत. (सौजन्य आयटीएलएफ मीडिया सेल) पुष्टी झालेले मृत्यू -112, जाळलेले गावे 197 जाळलेली घरे 7000 हून अधिक, जाळलेली चर्चेस आणि ख्रिश्चन वसाहती -359, विस्थापित झालेले लोक -41,425.
या घटनेत देखील नेहमीप्रमाणे सर्व जातींचे निष्पाप लोक पंथ आणि पार्श्वभूमी मोठा त्रास भोगाव लागत आहे. आम्हाला आमच्या ख्रिश्चन बांधवांबद्दल अत्यंत वाईट वाटत असून गेल्या दोन ‘अडीच महिन्यांपासून तेथील प्रामुख्याने ख्रिश्चन बांधवांना लक्ष्य केले जातय हे धक्कादायक आहे. या परिस्थितीमुळे तेथील सर्वसामान्य लोकांचे जीवित तर धोक्यात आलेच आहे शिवाय ख्रिश्चनांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे निवेदनात नमूद आहे.
याखेरीज मणिपूर येथील परिस्थितीचे विश्लेषण, मणिपूर येथील हिंसाचाराच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचे मत आदी बाबींसह हिंसाचाराच्या माध्यमातून ठराविक लोकांना लक्ष्य करण्याच्या या निष्ठूर व निर्दयी कृत्याचा आम्ही निषेध करतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदनात शेवटी पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ परिणामकारक पावले उचलून मणिपूर येथे चाललेला हिंसाचार आणि तात्काळ थांबून कायदा व सुव्यवस्था पुनर्प्रस्थापित करावी, सरकारने संबंधित सर्व लोकांशी फलदायी वाटाघाटी करून सध्याच्या परिस्थितीचे कारण समजू शकेल आणि योग्य ती पावला उचलता येतील, निष्पक्ष सखोल चौकशी करून प्रत्येकाला न्याय मिळवून द्यावा,
संबंधित सक्षम अधिकारी आणि एजन्सीजनी मानवता आणि जबाबदारीने काम करून हिंसाचाराची झळ बसलेल्या ख्रिश्चन बांधवांना सामाजिक न्याय आणि सुरक्षा मिळवून द्यावी, मणिपूर राज्यातील हिंसाचाराची झळ सोसणाऱ्या आमच्या ख्रिश्चन बांधवांबद्दल आम्हाला चिंता लागून राहिली असून त्यांच्या जीवितेच्या सुरक्षेसह तेथील सर्वसामान्य जीवनाचे, उध्वस्त घरे, शाळा, हॉस्पिटल्स, अनाथालय आणि चर्च सारख्या प्रार्थना स्थळांचे पुनर्वसन केले जावे.