Wednesday, November 27, 2024

/

अखेर हटवली कॅसरलॉक -दुधसागर लोहमार्गावरील दरड

 belgaum

बेळगाव  लाईव्ह :मुसळधार पावसातही गेल्या सहा दिवसांपासून अथक परिश्रम घेऊन कॅसरलॉक -दुधसागर लोहमार्गावरील दरड हटवण्यात आली आहे. आज या मार्गावर चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाली आहे.

कॅसरलॉकजवळील करंजोड स्थानकच्या बोगद्यामध्ये दरड कोसळली होती. त्यामूळे वाहतूक बंद होती. सहा दिवसांनंतर लोहमार्ग खुला झाला असून त्यासाठी मुसळधार पावसात रेल्वे कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले.

लोहमार्ग बंद झाला होता. त्यामुळे या मार्गावरून धावणारी सर्व रेल्वे दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात आल्या होत्या. या भागात पडणाऱ्या पावसाचा जोरामुळे हटवण्यात आलेली दरड पुन्हा कोसळतच होती. यामुळे सदर दरड दिवस-रात्र काम करून हटवण्यात आली. तर तीन नंबर बोगद्याजवळ २०० मीटर लोहमार्ग खराब झाल्याने नवीन लोहमार्ग उभारण्यात आला आहे.

रविवारी सायंकाळी या मार्गावरून प्रथम रेल्वेची इंजिन व त्यानंतर रिकामी मालवाहू (गुडस) ट्रेन फिरवण्यात आली. त्यामुळे पुन्हा या मार्गावर आता नेहमी प्रमाणेच ट्रेन धावणार आहेत.Dudhsagar

मुसळधार पाऊस असूनही सतत आणि अथक प्रयत्नांनंतर, हुबळी विभागातील ब्रागांझा घाट विभागातील कॅसल रॉक आणि करंनजोड स्थानकांदरम्यानची भूस्खलन साफ ​​करण्यात आली आहे. आज दुपारी 12 वाजता ट्रॅक पुनर्संचयित करण्यात आला आणि ‘फिट’ असल्याचे प्रमाणित करण्यात आले.

सुरक्षेच्या मापदंडांच्या संदर्भात ट्रॅकच्या फिटनेसचे मूल्यांकन करण्यासाठी आणि प्रमाणित करण्यासाठी ताबडतोब एक चाचणी घेण्यात आली. याठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून ताशी 10 किमी वेगावर मर्यादा घालण्यात आली आहे.दरम्यान यापूर्वी या मार्गावरून रद्द केलेल्या, बदल केलेल्या गाड्या निर्धारित काळासाठी बंद राहणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.