गृहलक्ष्मी नोंदणीसाठी लॉगिनचा गैरवापर करून पैसे वसुली करणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी गाव एक केंद्राच्या लॉगिन आयडीचा वापर करून लोकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव शहरातील चव्हाटगल्ली येथे जनता ऑनलाइन सेंटर चालवणारे अद्रिश आर.टी. आणि मुतगा गावात ग्राम वन चे किरण चौगुला या दोघांवर याप्रकरणी बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्यात याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गृहलक्ष्मी लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी पैसे वसूल केले जात असल्याच्या जनतेच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी चव्हाट गल्ली येथील जनता ऑनलाइन केंद्रावर छापा टाकला. महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक आर.नागराज, बेळगावचे तहसीलदार सिद्धराय बोसगी आणि नगर बालविकास प्रकल्प अधिकारी भजंत्री यांनी जनता ऑनलाइन केंद्रावर छापा टाकून अवैधता उघडकीस आणली.
यानंतर केंद्राला कुलूप लावून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांच्या नोंदणी प्रक्रियेदरम्यान नियमबाह्य काम करणाऱ्या मुतगा गाव एक केंद्राचा परवानाही निलंबित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
शुक्रवारी शाळा पूर्ववत
बेळगाव जिल्ह्यात पावसाळी शाळांच्या सुट्ट्याना ब्रेक मिळाला असून शुक्रवार (28 जुलै) पासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पूर्ववत सुरू होणार आहेत.
बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शुक्रवारी पासून सर्व शाळा सुरू राहतील असे कळवले आहे. जिल्हा माहिती अधिकारी गुरुनाथ कडबुर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.
गेले तीन दिवस अतिवृष्टी मुळे शाळांना सुट्टी देण्यात आली होती.