Wednesday, December 4, 2024

/

‘गृहलक्ष्मी’ अर्ज प्रक्रियेला १९ जुलैपासून सुरुवात

 belgaum

बेळगाव लाईव्ह : निवडणुकीपूर्वी काँग्रेसने जाहीर केलेल्या हमीपत्रांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेची अर्ज प्रक्रिया १९ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

बेंगळुरू येथे एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या योजनेसाठी ग्राम वन किंवा बापूजी सेवा केंद्र, कर्नाटक वन , बीबीएमपी प्रभाग कार्यालय केंद्रांवर अर्ज करता येतील.

अर्ज भरण्यासाठी आधार कार्डशी जोडलेल्या खात्यात पैसे थेट हस्तांतरित केले जातील अशी माहिती त्यांनी दिली. सोमवारी गृहलक्ष्मी योजनेचा अधिकृत शुभारंभ होणार आहे, योजनेच्या उद्घाटनासाठी केंद्रीय काँग्रेस नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे, नेत्यांनी सहमती दर्शवल्यास १७ ऑगस्टला खात्यावर पैसे वर्ग केले जातील, नसल्यास १९ ऑगस्टला पैसे जमा होतील.Gruh Laxmi

गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ राष्ट्रीय नेत्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय नेत्यांना यापूर्वीच पत्र लिहिले आहे. नेत्यांनी सहमती दर्शवल्यास १७ तारखेला विधानसौध येथील बँक्वेट हॉलमध्ये उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी सोनिया गांधी यांना निमंत्रित करण्यात आले असून राष्ट्रीय नेत्यांचा निर्णय आज निश्चित होणार आहे.

गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही, गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत घरातील प्रमुख महिला सदस्याला दरमहा २ हजार रुपये मिळतील, असे त्यांनी नमूद केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.