Wednesday, December 4, 2024

/

शेअर बाजारातील चढ-उतार आणि सर्वसामान्यांच्या शंका!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शेअर मार्केट म्हटलं कि सर्वसामान्य नागरिकांच्या भुवया उंचावतात. मनात अनेक प्रश्नांची गुंतागुंत होते. सोशल मीडियावर किंवा आजवर ऐकलेल्या अनेक नकारात्मक गोष्टींचा पाढा डोळ्यासमोर येतो. मात्र शेअर मार्केट हे आपण जसे समजतो तसे नाही. ‘विज्ञान आणि कलेचे मिश्रण’ अशा स्वरूपातील शेअर मार्केटची प्रक्रिया आजवर कित्येकांना समजली नाही.

सोशल मीडिया किंवा एकमेकांकडून ऐकत आलेल्या गोष्टींमुळे शेअर मार्केटसंदर्भात अनेक नकारात्मक गोष्टी सर्वसामान्यांच्या मनात येतात. शेअर मार्केट वर जाणे किंवा खाली पडणे या पलीकडेही शेअर मार्केटमध्ये शिकण्यासारखे आणि महत्वपूर्ण असे खूप काही आहे. शेअर मार्केटच्या समुद्रात आपली नौका योग्य पद्धतीने उतरवायची आणि ती पार करायची कला आत्मसात करणे अत्यावश्यक आहे.

शेअर मार्केटमधील चढ-उतार बातम्या किंवा सार्वजनिक चर्चेच्या माध्यमातून आपण नियमितपणे ऐकतो. काहींना नोकरी गमावल्यानंतरही शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमुळे कसा आधार मिळाला याच्याही कथा आपण ऐकलेल्या असतात. 2020 मध्ये कोरोनाच्या विनाशकारी पर्वानंतर जो अर्थव्यवहार सगळ्यांत आधी लॉकडाऊनमधून सावरला त्यामध्ये शेअर मार्केटचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. 2021 पासून जगभरातल्या शेअरमार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी दिसायला लागली आहे.

याचाच अर्थ जगभरातल्या परकीय गुंतवणूकदार संस्था आणि जागतिक गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर मार्केटवर विश्वास आहे.भारतातील अनेक लोक मात्र शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे गुंतवणुकीपासून दूर आहेत.Share market

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे पण, माहिती नसल्यामुळे भीती वाटते अशा लोकांसाठी बेळगावमध्ये ‘भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून प्रशिक्षण पुरविले जात आहे. गेल्या 12 वर्षांपासून शेअर मार्केट संदर्भातील प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेने शेकडो यशस्वी गुंतवणूकदार तयार केले आहेत. शिवाय शेअर मार्केट संदर्भातील नकारात्मक दृष्टिकोन बाळगणाऱ्या अनेक प्रशिक्षणार्थींनाही यशस्वी शेअर मार्केट ट्रेडर बनविले आहे. सहज, सोप्या मार्गदर्शनातून या संस्थेतर्फे प्रशिक्षण देण्यात येते, याचसाठी अनेक शेअर मार्केट गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सची पावले या संस्थेकडे आकर्षित होतात.

कृष्णदेवराय सर्कल येथील सिटी प्लाझा बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर या संस्थेचे कार्यालय असून अत्याधुनिक टेक्निक्स आणि शेअर मार्केट संदर्भातील संपूर्ण माहिती सहज, सोप्या आणि सध्या पद्धतीने, प्रत्येक सर्वसामान्यांच्या भाषेतून शिकविली जाते हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. आजवर सेबी, एनएसइच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाने शेअर मार्केटकडे वळावे यासाठी जनजागृती करण्याचे उपक्रम हाती घेतले आहेत. याच धर्तीवर बेळगावमधील प्रत्येक सर्वसामान्य माणसाने शेअर मार्केटचे ज्ञान अवगत करून यश मिळवावे या हेतूने हि संस्था कार्यरत आहे.

विद्यार्थी आणि महिला वर्गासाठी विशेष सवलतीत नेहमीच या संस्थेने प्रशिक्षण पुरविले असून शेअर मार्केट संदर्भातील कोणत्याही माहितीकरिता, प्रशिक्षणाकरिता आणि अधिक माहितीकरिता ‘भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूट, तिसरा मजला, सिटी प्लाझा, कृष्णदेवराय सर्कल, बेळगाव, (संपर्क : 96630 71757) येथे अवश्य संपर्क साधावा. आपल्या मनात शेअर मार्केट संदर्भात असलेले सर्वसामान्य प्रश्न, शंका आणि भीती यावर नक्कीच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.