गेल्या पंधरा दिवसापासून सतत कोसळत असलेल्या पावसाने आता काहीशी उसंत घेतल्याने थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर पाण्याचे नीट निचरा न झाल्यामुळे साठलेल्या पाण्यात डासांची वाढ झाली आहे.कचऱ्याचे ढीग जागोजागी साचल्याने माशांची पैदास वाढली आहे त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. ताप खोकला अशा प्रकारचे सामान्य रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.
अजूनही शेत वाडीतील पाण्याचा पूर्णपणे निचरा न झाल्याने शेतीची कामे खोळंबलीचं आहेत. लागवड आणि खते टाकण्याचे काम अद्याप सुरूच नाही पाणी साचलेच्या साचलेल्या ठिकाणी जर खते टाकली तर पीक कुजण्याची भीती असते यासाठी पाणी पूर्णपणे सुकण्याची वाट आता शेतकरी पाहत आहेत.
काही ठिकाणी नटी लावणी लावण्याचे काम जोरदारपणे सुरू झालेला आहे. बेळगावच्या पूर्व भागात जिथे पाण्याचा निचरा झालेला आहे तिथे कोळपणी मारण्याचे काम चालू झालेला आहे एकंदर पीक परिस्थिती बरी वाटत आहे परंतु काही भागात शेती कामाची लगबग असल्याने मजुरांचा तुटवडा पडत आहे त्यामुळे शेती काम खोळंबण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे.
अधिक मास संपल्यानंतर श्रावणात सणांची रेलचेल असते त्यामुळे लोकही उत्साही वातावरणात श्रावणाची वाट पाहत आहेत यावर्षी आणि जर हंगाम शीर पाऊस व्यवस्थित झाला शेतीवाडी नीट पिकली तर कोविडच्या धक्क्यातून बाहेर निघालेले नागरिक यावर्षी मोठ्या प्रमाणात सणवार सुगी साजरे करतील.
त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही चांगली वर्ग चालू आहे सर्व परिस्थिती पाहता दिसत आहे नागरिकांचे मान सुधारत आहे अधिक मास लोकांच्यासाठी अधिक होण्याचा शक्यता आहे.
सोने चांदीचे भाव देखील वाढले आहेत भाजीपाला देखील वधारला आहे टोमॅटोची आवक नसल्याने तो मूल्यवान झाला आहे एकंदर या महिन्यातील जनजीवनाची ही स्थिती आहे.