सध्याच्या थंड हवामानात हवामानात खेकडे पकडणे पाण्यात जाऊन मौजमजा करणे याची माझा वेगळीच असते पण अश्या सारख्या ठिकाणी नाल्यात आणि पाण्यात जाऊन खेकडे पकडणे हे अनेक वेळा धोकादायक असते. पण त्यापेक्षाही शेतवडीतील जंगलाच्या वाटेने जाताना वाटेत एखाद्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन अघटित घटना घडणे हे दुर्मिळ असते. अशाच प्रकारे खानापूर तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे .
खानापूर तालुकयातील मेंढेगाळी मलवाड दरम्यान कुलमवाडा नाजिक शेततळीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा विद्युतभारीत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे.
या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव मारुती गोविंदप्पा वडर असे असून तो हल्ल्याळ तालुक्यातील अंत्रोळी गावचा रहिवासी आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, सदर व्यक्ती हलशी येथे आपल्या नातेवाईकाच्या घरी गेला होता त्याला खेकडे पकडायचा छंद अधिक होता
त्यामुळे अन्य काहींच्या समवेत तो मेंढेगाळी मार्गे कापोली ग्रामपंचायत क्षेत्रातील कुलमवाडा भागात असलेल्या शेततळीत गुरव नामक एका शेतकऱ्याच्या शेतातून जात असताना जंगली जनावरांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या हायबॅक्स तारेला स्पर्श झाल्याने तो जागीच ठार झाला.
तर आम्ही एकच सोबत असलेल्या व्यक्ती झटका लागतात बाजूला पडून बालाबाल बचावला आहे. शेतकरी अलीकडे पिकांचे संरक्षण करण्यासाठी झटका करंट अर्थात हायबॅक्स लावून शेती पिकाचे संरक्षण करत आहेत. पण या ठिकाणी त्या झटका करंट अर्थात हायबॅक्स तारेला कुठून तरी विद्युत भारीत तारेचा स्पर्श झाल्याने शेतवाडीतून जाताना त्या खेकडे पकडू व्यक्तीला जोराचा झटका बसल्याने तो जागीच ठार झाला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे
पण विद्युत भारित तारेचा स्पर्श त्या झटका करंट तारेला स्पर्श कसा झाला याची माहिती उपलब्ध झाली नाही. घटनास्थळी हेस्कॉम खात्याचे सहाय्यक अधिकारी चक्रिमठ सह आदी अधिकारी उपस्थित होते.