Friday, December 27, 2024

/

‘दक्षिण’ मधील रेंगाळलेली कामे लावू मार्गी -मंत्री जारकीहोळी

 belgaum

बेळगाव दक्षिण मतदार संघातील समस्या प्राधान्याने सोडवण्याबरोबरच रेंगाळलेली विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले आहे.

आदर्शनगर रोड वडगाव येथील युवा नेते सनी तेलसंग यांच्या घरी मंत्री सतीश जारकीहोळी आणि धावती भेट दिली. त्यावेळी बेळगाव दक्षिण मतदार संघातील रेंगाळलेली विकास कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत अशी मागणी या मतदारसंघातील युवा कार्यकर्त्यांनी मंत्री जारकीहोळी यांच्याकडे केल्यानंतर ते बोलत होते.

बेळगाव दक्षिण मतदार संघात हाती घेण्यात आलेली विकास कामे विधानसभा निवडणुकीनंतर थंडावली आहेत. ही रेंगाळत पडलेली कामे त्वरेने पूर्ण करावीत अशी मागणी सनी तेलसंग ,निखिल सुभांजी यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली. त्यावर मंत्र्यांनी दक्षिण मतदार संघातील रेंगाळलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.Sunny telsang

यावेळी सदर मतदार संघातील घिसाडघाईने झालेली निकृष्ट दर्जाची विकास कामे, शहापूर वडगाव खासबाग आदी भागातील तुंबणाऱ्या ड्रेनेजची समस्या, वडगाव भागात अनेक घरातून शिरनारे पाणी याबाबत मंत्री जारकीहोळी यांना कल्पना दिली असता.

याप्रकरणी लक्ष घालून दक्षिण मतदार संघातील समस्या प्राधान्याने सोडवण्यावर भर दिला जाईल असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार असिफ सेठ, कित्तुरचे आमदार बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.