बेळगाव जिल्ह्यात जुलै महिन्याच्या गेल्या सहा दिवसात सरासरी 23.2 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक 78.8 मि.मी. पाऊस खानापूर तालुक्यात तर सर्वात कमी 4.7 मि.मी. पाऊस गोकाक तालुक्यात झाला आहे.
गेल्या जून महिन्यात जिल्ह्यात 26.84 मिलिमीटर पाऊस झाला होता. मात्र आता गेल्या 2 जुलैपासून पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे आतापर्यंत 23.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरी 184 मि.मी. पाऊस पडतो.
यंदा गेल्या 1 जुलैला 3 मि.मी., 2 रोजी 2.25 मि.मी., 3 रोजी 5.72 मि.मी., 4 रोजी 4.27 मि.मी., 5 रोजी 0.91 मि.मी. आणि 6 रोजी 7.04 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या सहा दिवसात अथणी तालुक्यात 12.6 मि.मी., बैलहोंगलमध्ये 21.2 मि.मी., बेळगावमध्ये 36.2 मि.मी., चिक्कोडी येथे 24.2 मि.मी., गोकाकमध्ये 4.7 मि.मी., हुक्केरीत 17.8 मि.मी., कागवाडमध्ये 9.6 मि.मी., खानापूर तालुक्यात 78.2 मि.मी., कित्तूरमध्ये 23.1 मि.मी., मुडलगी येथे 27.9 मि.मी., निपाणी मध्ये 24.2 मि.मी., रायबाग मध्ये 13.2 मि.मी., रामदुर्गमध्ये 10.2 मि.मी. तर सौंदत्ती मध्ये 21.2 मि.मी. पाऊस नोंदविला गेला आहे.
जिल्ह्याप्रमाणे बेळगाव तालुक्यातील विविध ठिकाणच्या पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी गेल्या 6 दिवसात नोंदवला गेलेला एकूण पाऊस पुढीलप्रमाणे आहे. बेळगाव आयबी 36.2 मि.मी., बेळगाव रेल्वे 37.0 मि.मी., बागेवाडी 32.2 मि.मी., देसूर 68.6 मि.मी., काकती 26.9 मि.मी., राकसकोप 90.7 मि.मी., सांबरा 25.7 मि.मी., संतीबस्तवाड 79.1 मि.मी., सुळेभावी 25.6 मि.मी., उचगाव 59.1 मि.मी..
यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाल्यामुळे जून महिन्यात कमी पाऊस झाला. आता जुलै महिन्यात पावसाने सुरुवात केली असली तरी अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.