बेळगाव लाईव्ह : बेंगळुरू शहराच्या दक्षिण विभागातील बीव्ही पुरम पोलिस विभागाने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीला आज अटक केली आहे.
या कारवाईत सुमारे ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ओपीएम स्ट्रिप्स हे अंमली पदार्थ राजस्थानमधून कुरियरच्या माध्यमातून कमी किंमतीत आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे हि कारवाई करत आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर अंमली पदार्थ घरी मिसळून त्यावर प्रक्रिया करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, विविध पार्ट्यांना आणि सॉफ्टवेअर अभियंत्यांना पुरविले जात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
राजस्थानमधून कुरियरच्या माध्यमातून हे अंमली पदार्थ आणल्यानंतर याची विक्री बेंगळुरू मध्ये केली जात असल्याचे उघड झाले आहे. या टोळीचा छडा लावत पोलिसांनी राजस्थानमधील एका व्यक्तीला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून विक्रीसाठी आणण्यात आलेले ५५ किलो अंमली पदार्थ आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले गुड्स वाहन देखील जप्त करण्यात आले आहे.