Saturday, January 4, 2025

/

स्थायी समिती निवडणूक : पाच दोन फॉर्म्युल्यावर बिन विरोधची शक्यता?

 belgaum

स्थायी समिती समिती निवडणुकीत चारी स्थायी समिती भाजपकडे राहणार आहेत.आता पर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्र एकीकरण समितीचे बहुमत होते सत्ताधारी म ए समितीला चार आणि विरोधी गटाला तीन सदस्य असे समीकरण होते पण या वेळेला भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असल्याने एकूण सदस्य संख्ये सात पैकी पाच दोन असे समीकरण होऊ शकते.

बेळगाव मनपात अर्थ आणि कर, आरोग्य सामाजिक न्याय आणि नगर नियोजन आणि बांधकाम यासह लेखा अश्या चार स्थायी समित्या आहेत.

बेळगाव मनपात विरोधी गटाने भाजपकडे चार तीन अशी मागणी केली मात्र भाजपने नेत्यांनी सदर मागणी धुडकावून पाच दोन किंवा निवडणूक झाल्यास सात झिरो असा प्रस्ताव दिला होता त्यामुळे अखेर पाच दोन अश्या समिकरणवर संगनमत झाल्याचे समजते.दुपारी याबाबत प्रादेशिक आयुक्त निकाल घोषित करणार आहेत.

बेळगाव महानगरपालिकेच्या विविध स्थायी समित्यांच्या निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया आज शनिवारी सकाळी सुरू झाली असून चार स्थायी समितीच्या या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या सदस्यांनी अर्थात नगरसेवकांनी नामांकन पत्रे दाखल केली आहेत.

बेळगाव महापालिकेच्या अर्थ स्थायी समिती, सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती, महसूल स्थायी समिती आणि आरोग्य स्थायी समिती या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी सदर नामांकन पत्रे दाखल करण्यात आली आहेत.

आतापर्यंत या चार समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज सकाळी प्रारंभीच्या सत्रात नामपत्र भरण्याची मुदत संपण्यास एक तास असताना भाजप आणि काँग्रेसच्या एकूण 28 नगरसेवकांनी नामांकनपत्रे दाखल केली आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.