बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील जैन मुनि आचार्य 108 कामकुमार नंदी महाराज स्वामी यांचा संशयास्पद रित्या मृत्यू झाल्याची बाब शुक्रवारी रात्री समोर आली आहे.
चिकोडी हिरेकुडी मधून जैन मुनि बेपत्ता झाल्याची तक्रार चिकोडी पोलिसात नोंद करण्यात आली होती त्या जैन मुनिंचा खून करून मृतदेह फेकून देण्यात आला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दोन दिवस मठामधून बेपत्ता झाल्यानंतर स्वामीजींच्या भक्तांनी शोध मोहीम केल्यानंतर अखेर चिकोडी पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची घटना तक्रार दाखल केली होती.
या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर शुक्रवारी रात्री जैनमुनींच्या खून झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून मृतदेह शोधण्याचे काम चालू आहे. संशयितांनी मूनिंचा खून करून मृतदेह फेकून दिल्याची माहिती समोर येत असून संशयित पोलिसांना योग्य माहिती देत नसल्याने मृतदेह मिळण्यास विलंब होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हिरेकुडी मठ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आणि नेमके स्वामींच्या मृत्यूचे कारण काय त्यांचा घात झाला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.