Sunday, January 5, 2025

/

अंधश्रध्देला फाटा देत जखमी कावळ्याला जीवदान!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कावळ्याचा स्पर्श झाला की अपशकुन मानला जातो. मात्र अंधश्रध्देला फाटा देत एका जखमी कावळ्याला जीवनदान देण्याचे कार्य सेंट जोसेफ शाळेच्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी केलं आहे. श्रुंगी तेंडोलकर असे या विद्यार्थिनीचे नाव असून शिकवणीवरून घरी जाताना वाटेत जखमी अवस्थेत दिसलेल्या कावळ्याला जीवदान देत या विद्यार्थिनीने कौतुकास्पद काम केले आहे.

शिकवणीवरून परतताना एका कुत्र्याच्या हल्ल्यातून निसटलेला एक जखमी अवस्थेतील कावळा श्रुंगीच्या निदर्शनास आला. या कावळ्याचे पाय तुटले होते. मात्र मुसळधार पावसात देखील मानवतावादी दृष्टिकोन ठेवून पक्षीप्रेमी जपणाऱ्या शृंगीने कावळ्याला जीवनदान देण्याचे ठरविले.सामान्यतः कावळ्याला स्पर्श करणे हे अपशकुनी मानले जाते. मात्र अंधश्रद्धेच्या या गोष्टी दूर सारत शृंगीने पक्षप्रेम दाखवत त्या कावळ्याला आपल्या घरी आणले.

कावळ्यावर प्राथमिक उपचार करून त्यानंतर वन अधिकाऱ्यांना बोलावून जखमी कावळ्याला रेस्क्यू ऑफिस इन्चार्ज विभागाकडे सुपूर्द केले. विभागीय वन अधिकारी पुरुषोत्तम जी. के. आणि सहाय्यक ईश्वर नायक यांनी या कावळ्याला आपल्याकडे घेत शृंगीच्या धाडसी कार्याचे कौतुक केले.Bird lover students

सामान्यतः लोक कावळ्याला स्पर्श करण्यास किंवा पकडण्यास किंवा त्याकडे लक्ष देण्यास कचरतात परंतु या चिमुरडीने समाजाचे सर्व नियम बाजूला ठेऊन केवळ मानवतेच्या आधारे पक्ष्याला वाचवले हे खरोखर एक वीर कृत्य असल्याची प्रतिक्रिया यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

भविष्यात अशी कोणतीही घटना आढळून आल्यास वनविभागाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. श्रुंगी तेंडोलकरहिने यापूर्वीही अनेक कुत्री, मांजर, पेगियन, ओव्हल, आणि चिमण्यांना वाचवले आहे. तिच्या या अभिनयाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सिटीझन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर यांची ती कन्या असून तिने केलेल्या या कार्याचे कौतुक होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.