Wednesday, November 20, 2024

/

बळळारी नाला शेतकऱ्यांना शाप की वरदान?

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बहुतांश बेळगाव परिसरातले शेतकरी बळळारी नाल्याला दरवर्षी पावसात येणाऱ्या पुराला अनुसरून शेतकऱ्यांना वरदान नसून शाप आहे असेच म्हणत आहेत.प्रशासनाची व्यवस्था,शेतात येणारे सांडपाणी,तुंबून जाणारी शेती आणि भात शेतीचा होणार नुकसान यासह वर्षातून तीन-चार वेळा परिसराला येणारा पूर या गोष्टीकडे लक्ष देता नाला हा वरदान नसून शाप आहे अशी शेतकऱ्यांची भावना बनली आहे.

येळळूर वडगाव ,शहापूर बेळगाव जुने बेळगाव,हलगा कुडची सांबरा शिवारातून वाहणारा हा ओढा मजगाव जवळून उगम पावलेला आहे हा नाला तब्बल 28 किलोमीटर लांब वाहतो त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात भात शेती पिकवली जाते आणि या भात शेतीच पावसाळ्यात दरवर्षी दोन तीन वेळा पूर आल्यामुळे नुकसान होते. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाला प्रशासन तटपुंजी मदत देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न होतो मात्र शेतकरी त्रासाताच असतो.

बेळगावच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना शाप ठरलेला हा बळळारी नाला वरदान ठरण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? हा नाला वरदान आहे का ? याची चाचणी आम्ही करणार आहोत.

Bellari nala flood
कोणत ही गावं वसतात कोणत्याही जलस्त्रोताच्या शेजारी. बेळगावच्या शेजारून वाहणाऱ्या नाल्याला बळळारी नाला म्हटलं जातं तो बळळारी नाला नसून तो जिवंत झऱ्यानी नटलेला ओढा आहे. त्या ओढ्यात जिवंत पाण्याचे झरे असल्यामुळे बारा महिने पाण्याचा तो स्त्रोत आहे. सदर ओढ्याचे पाणी अनेक वेळा शेतीलाही उपयोगी पडतं. पूर्वीच्या काळी या पाण्याचा पिण्यासाठी हे वापर केला जायचा. शेतकरी ज्यावेळी शेतात कामाला येत असत त्यावेळी त्यांना पिण्यासाठी या पाण्याचा उपयोग होत होता.

जर हे पाणी व्यवस्थित केल्यास हा ओढा चांगल्या पद्धतीने संवर्धन केल्यास त्याचे पाणी शहरालाही पुरवठा करू शकणार्‍या दर्जाचे आहे कारण त्याच्या जिवंत झऱ्यामुळे नैसर्गिक पाणी शुद्ध स्वरूपात मिळू शकते. त्याचबरोबर शेतीसाठी पाणी लागते तेही पाणीपुरवठा या माध्यमातून करू शकतो. त्यामुळे बळळारी ओढा हा घाण पाणी किंवा सांडपाण्याचा गटार नसून हा जिवंत नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत असल्यामुळे या नाल्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

पावसाचे पाणी नियमितपणाने दरवर्षी येणारच, ते पाणी वरून आकाशातून पडणारे पाणी, वाहत होऊन समुद्रापर्यंत किंवा पुढच्या जलाशयापर्यंत पोहोचवण्यासाठी ओढे नाले यांची गरज असतेच. त्या दृष्टीने नाला एवढा हा महत्त्वाचा आहे कारण बेळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पावसाचे पाणी वाहते करण्यासाठी बळळारी नाला खोदून त्याची व्यवस्थित पद्धतीने निगा राखली तर कोणत्याही शिवारात ते पाणी शिरणार नाही. आणि योग्य प्रकारे पुढील नदीला जाऊन मिळेल त्यामुळे एक प्रकारचा पाण्याचा निचरा करण्याचा हा चांगला प्रकारचा मार्ग निश्चितपणाने परत एकदा उपयोगात आणता येईल.Bellari nala

नैसर्गिक पाणी वाहणारा हा ओढा आहे आणि तो मानव निर्मित नसून असल्यामुळे त्याची गरज ही निसर्गाने ओळखलेली आहे. माणसाने त्याचा संवर्धन करने त्याचा मार्ग बदलणे किंवा त्याच्यात अडथळे आणणे किंवा त्यांना मुजवणे अशा पद्धतीचा कोणत्याही प्रकार केला तर दरवर्षी पाण्याचा जो नियमित निचरा होतो तो होणार नाही पूरस्थिती निर्माण होईल जिथे माणसाने नैसर्गिक पाण्याच्या वाहतेपणाला अडवले तिथे तिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा अगदीच अशा घटना घडल्या गेलेत हा निसर्गाचा आणि रोख ओळखून माणसाने निसर्गाच्या प्रत्येक कृती बरोबर वागले पाहिजे हे निसर्गाचे नैसर्गिक स्त्रोत आहेत ते जिवंत ठेवणं काळाची गरज आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.