कमी पावसातही पिके जोमाने वर आली आहेत. मेरा गवताने फुलून गेल्या आहेत तरीही एकंदर परिस्थिती पाहता पावसाचे मान कमीच वाटत आहे. सृष्टी जरी हिरवीगार झाली असली तरी मोठ्या पावसाची गरज आहे. एकंदर भात पोसवण्यासाठी मोठा पाऊस येणे गरजेचे आहे सलग पावसाची शक्यता जर निर्माण झाली तरच यंदाचे पीक हंगामशीर व्यवस्थित येईल अशी चिन्ह आहेत ,आणि शेतकरी त्यामुळे काहीसा चिंतेत असताना दिसत आहे.
शेताची काम चालूच आहेत लागवड टाकण्याबरोबरच, फेसाटी मारायचे चालू आहे. शेतकरी बांधावरचे गवत काढून जनावरांना घेऊन जाण्यासाठी तत्पर झाला आहे काही ठिकाणी नट्या लावायचं काम चालू आहे जिथे तुटाळ झालेला आहे तिथं नटी लावत आहेत अशा प्रकारे शेतातली काम जोरात चालू असतानाच काही जणांनी आपले शेत न करता तसेच पड ठेवली आहेत हेही चित्र दिसत आहे.
कारण यंदा पावसाची चिन्ह कमी दिसत असल्यामुळे शेतकरीही चिंतातूर आहे, कही शेतकरी मात्र जोमाने शेतीकडे लक्ष पुरवत आहेत.
एकूणच यंदा जर पाऊस पुढे मोठा आला नाही तर परिस्थिती खूप बिघडण्याची चिन्ह आहेत. त्याचबरोबर पावसाचा मान कमी राहिला तरी यावर्षी पिण्याच्या पाण्याची दुर्भिक्षता जाणवण्याची शक्यता आहे.यासाठी आतापासूनच नागरिकांनी पाणी नियोजन करणे गरजेचे आहे. आपल्याकडे असणारा पाण्याचा स्त्रोत जे आहेत त्याच्यावर व्यवस्थित नजर ठेवून राहणे गरजेचे आहे.पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे, कारण आता जर या जुलै महिन्यात अशी परिस्थिती असेल तर पुढचा येणारा काळ फार कठीण आहे, असं वाटते. त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांच्या एकंदर परिस्थितीकडे लक्ष देताना त्याला शेती परवडत ,नाही दरवेळी पाय खोलातच जातो . काही शेतकऱ्यांनी प्रयोगात्मक बदलण्याचाही प्रयत्न केलेला आहे. त्याकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
काही शेतकऱ्यांनी पूर्व भागात यावर्षी रताळी लावण्याचा प्रयोग केलेला आहे तोही प्रयोग कसा यशस्वी होतो की काय होतो हे बघणे महत्वाचे ठरेल याप्रमाणे एकंदर शेतीचे मान आहे आणि सध्या पाऊस कमी असल्याने मोठ्या पावसाची नितांत गरज आहे अशी शेतकऱ्यांची भावना आहे.