बेळगाव जिल्ह्यात आता खऱ्या अर्थाने पावसाळा सुरू झाला असून या जुलै महिन्यात आतापर्यंत बेळगाव शहर परिसरात 198.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 403.2 मि.मी. इतका पाऊस खानापूर तालुक्यात नोंदविला गेला असून सर्वाधिक कमी पाऊस रामदुर्ग (41.9 मि.मी.) येथे झाला आहे.
बेळगाव शहर परिसरात दरवर्षी जुलै महिन्यात सर्वसामान्यपणे 455 मि.मी. पावसाची नोंद होत असल्यामुळे अद्याप 256.2 मि.मी. पाऊस पडणे बाकी आहे. त्याचप्रमाणे दरवर्षीची 756 मि.मी. इतकी या महिन्यातील सरासरी गाठण्यासाठी खानापूर तालुक्यात अजून 352.8 मि.मी. पावसाची गरज आहे.
दरम्यान आज गुरुवारी 20 जुलै रोजी बेळगाव शहर परिसरात 22.0 मि.मी. तर खानापूर तालुक्यात 41.2 मि. मी. पाऊस झाला आहे बेळगाव जिल्ह्यातील पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी गेल्या मंगळवारपासून आजपर्यंत पडलेल्या पावसाची नोंद (अनुक्रमे पर्जन्यमापन
केंद्र : जुलै मधील सर्वसामान्य पाऊस – दि. 18, 19, 20 रोजी पडलेला पाऊस, आणि एकूण पाऊस यानुसार) खालील प्रमाणे आहे.
अथणी एचबीसी : सर्वसामान्य पाऊस 65 मि.मी. – दि. 18 रोजी 0.8 मि.मी., दि. 19 रोजी 16.6 मि.मी., दि. 20 रोजी 2.4 मि.मी., एकूण पाऊस 44.2 मि.मी.. बैलहोंगल आयबी : 129 मि.मी. – 5.8 मि.मी., 29.6 मि.मी., 8.4 मि.मी., 84.0 मि.मी.. बेळगाव आयबी : 455 मि.मी., – 20.6 मि.मी., 50.2 मि.मी., 22.0 मि.मी., 198.8 मि.मी.. चिक्कोडी : 134 मि.मी. – 2.8 मि.मी., 25.2 मि.मी., 10.2 मि.मी., 98.2 मि.मी.. गोकाक : 68 मि.मी. – 9.3 मि.मी., 10.3 मि.मी., 2.2 मि.मी., 48.7 मि.मी.. हुक्केरी एसएफ : 150 मि.मी. – 4.4 मि.मी.,
16.7 मि.मी., 6.5 मि.मी., 66.6 मि.मी.. कागवाड (शेडबाळ) : 68.5 मि.मी. – 1.4 मि.मी., 29.6 मि.मी., 7.8 मि.मी., 53.0 मि.मी.. खानापूर : 756 मि.मी. – 29.8 मि.मी., 80.2 मि.मी., 41.2 मि.मी., 403.2 मि.मी.. कित्तूर : 270 मि.मी. – 6.2 मि.मी., 65.4 मि.मी., 12.3 मि.मी., 145.8 मि.मी.. मुडलगी : 67 मि.मी. – 1.2 मि.मी., 16.3 मि.मी., 4.2 मि.मी., 66.8 मि.मी.. निप्पाणी आयबी : 201.8 मि.मी. – 9.5 मि.मी., 26.8 मि.मी., 15.0 मि.मी., 138.7 मि.मी..
रायबाग : 74 मि.मी. – 2.6 मि.मी., 13.0 मि.मी., 3.0 मि.मी., 43.8 मि.मी.. रामदुर्ग : 64 मि.मी. – 3.3 मि.मी., 16.3 मि.मी., 1.1 मि.मी., 41.9 मि.मी.. सौंदत्ती : 76 मि.मी. – 5.0 मि.मी., 19.6 मि.मी., 5.6 मि.मी., 62.2 मि.मी..