Friday, December 27, 2024

/

हिंदवाडीत अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

 belgaum

एका 12 वर्षीय मुलीने मोठ्या धाडसाने प्रतिकार केल्यामुळे तिच्या अपहरणाचा प्रयत्न फसल्याची खळबळजनक घटना काल मंगळवारी सायंकाळी 6:39 वाजण्याच्या सुमारास हिंदवाडी येथील जुन्या महावीर गार्डन जवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याचे समजते. तथापि या प्रकारामुळे पालकवर्गात मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसापासून एक अज्ञात व्यक्ती संबंधित अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होती. काल मंगळवारी सायंकाळी अपहरणकर्ता त्या मुलीच्या क्लासच्या परिसरातच घुटमळत होता. ती क्लास मधून बाहेर पडल्यानंतर तिला त्याने चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला नकार देताच त्याने तिला जबरदस्तीने उचलून घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा त्या मुलीने अपहरणकर्त्याच्या गालाला आणि गळ्याला ओरबाडण्यास सुरुवात केली. त्यावेळी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना ती मुलगी आपल्या वडिलांबरोबर मस्करी करत असावी असे वाटले. तथापि जेंव्हा तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली त्यावेळी महावीर गार्डन मधील माळ्याला संशय येऊन त्यांने त्या अपहरणकर्त्याच्या दिशेने धाव घेतली. तेंव्हा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने त्या मुलीला तेथेच सोडून सुभाष मार्केटकडून पोबारा केला.

सदर प्रकारानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी मुलीची विचारपूस केली असता तिने घडला प्रकार सर्वांना सांगितला. नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच टिळकवाडी पोलिसांना घटनास्थळी दाखल होऊन तपास कार्य हाती घेतले आहे. घटनास्थळानजीक असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्या आधारे अपहरणकर्त्याचा शोध जारी आहे. मात्र या पद्धतीने भर रस्त्यावर अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न घडल्यामुळे हिंदवाडी परिसरातील पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरण्याबरोबरच चिंता व्यक्त केली जात आहे.Cctv

दरम्यान, संबंधित 40 ते 45 वयोगटातील अपहरणकर्ता हा शहरातील मारुती नगर सांबरा रोड परिसरातील असल्याची माहिती उपलब्ध झाली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्या मुलीचे अपहरण करण्याचा मागचा त्याचा हेतू काय होता ? कुणाच्या सांगण्या वरून त्याने हे कृत्य केले नसावे ना? किंवा त्याची मानसिक स्थिती बिघडली होती का? अशा सर्वांगाने टिळकवाडी पोलीस सध्या तपास करत असून हा तपास आणि चौकशी अंती अपहरणाच्या प्रयत्नाचे नेमके कारण समोर येणार आहे.

 

सदर घटना cctv मध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली आहे. अपहरणच्या प्रकारामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.