गृहलक्ष्मी योजनेची नोंदणी करण्यासाठी बेकादेशीर रित्या पैशाची मागणी करणाऱ्या दोन ग्राम वन केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे.
अथणी तालुक्यातील अवरखोड गावात तर रायबाग तालुक्यातील चिंचली या दोन ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धाड टाकून भाग्यलक्ष्मी योजनेच्या नोंदणीसाठी अनाधिकृतितरित्या पैशाची मागणी करणाऱ्या दोन केंद्रांना टाळे ठोकले आहे गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी अथणी अवरखोड ग्राम वन केंद्रात नोंदणी करण्यासाठी अवैधरीत्या अधिक पैसे घेत असल्याच्या तक्रारी वरून सदर केंद्र सिज करून संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्य एका धाडीत रायबाग तालुक्यातील चिंचली बस स्थानकाजवळील ग्राम वन केंद्रावर धाड टाकून त्या केंद्राची लॉग इन आय डी रद्द करण्यात आली आहे. शहरात बेळगाव वन तर ग्रामीण भागात ग्राम वन केंद्रात गृहलक्ष्मी योजनेची नोंदणी करण्यात येत आहे.
बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गृह लक्ष्मी योजनेची नोंदणी करण्यासाठी बेकायदेशीर पैसे घेत असलेल्या तक्रारी वरून कारवाई केल्याची माहिती दिली आहे.