अमरनाथ यात्रेला बेळगाव हून गेलेले 35 यात्रेकरू परतीच्या प्रवासात अनंतनाग जवळ गेल्या तीन दिवसापासून अडकले आहेत. सर्वजण सुरक्षित असून भारतीय सैन्य दलाकडून कॅम्प मध्ये त्यांची सोय झाली आहे.
जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश मध्ये होत असलेल्या तुफान पावसाने बेळगावहून अमरनाथ यात्रेला गेलेले यात्रेकरू परतीच्या प्रवासात अडकले आहेत.उत्तर भारतात अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे.
अमरनाथ यात्रेच्या मार्गावरील ब्रिज कोसळल्याने अनेक ठिकाणी लँड स्लाइडिंग झाल्याने अमरनाथ यात्रेला गेलेले हजारो यात्रेकरू अडकले आहेत त्यात बेळगावचे यात्रेकरू आनंद नाग सारख्या संवेदनशील ठिकाणी तीन दिवस झाले एकाच ठिकाणी अडकून आहेत.
ब्रीज कोसळल्याने आणि रोड स्लायडिंग झाल्याने बेळगाव हून गेलेले २५पुरुष आणि दहा महिलांची तुकडी अनंतनाग सारख्या संवेदनशील ठिकाणी अडकली आहेत.सर्वजण सुरक्षित असून बेस कॅम्प मध्ये सोय जेवण राहण्याची सोय भारतीय सैन्य दलाकडून केली जात आहे.माजी आमदार अनिल बेनके यांनी दूरध्वनी वरून सर्व यात्रेकरूंची चौकशी केली कोणतीही मदत देण्याचे आश्वासन दिले.
यात्रेचा मार्ग दुरुस्त झाल्यावर बेळगावच्या या ३५ जणांचा परतीचा प्रवास पुढे सुरू होणार असून त्यानंतर ते बेळगाव कडे रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.दरवर्षी बेळगाव मधून शेकडो भाविक अमरनाथ यात्रेला जात असतात यावेळी सदर ३५ जणांची तुकडी यात्रेला गेली होती.
बेळगावातील अमरनाथ यात्रेला गेलेल्या टीम मध्ये
सोमनाथ हलगेकर,संतोष दिवटे,ऋतुराज बिडीकर, परशुराम बेर्डे, नितीन आनंदाचे,विनायक पाटील नंदू गुरव,आदेश पाटील,रेणुका बिडिकर श्वेता हलगेकर,श्रद्धा बडमंजी आदी सहभागी झाले आहेत.