Friday, January 10, 2025

/

भुटकोट किल्ल्याचा खंदक वाचवा

 belgaum

बेळगावच्या भुईकोट किल्ला भोवती असणारा खंदक रचना ही एक ऐतिहासिक समज नवीन पिढीला करून देण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे .पूर्वीच्या काळात किल्ला हा राज्य संरक्षणासाठी, राजाच्या वास्तव्यासाठी, सैन्याच्या शिबंदीसाठी महत्त्वपूर्ण अशी वास्तु गणली गेलेली आहे.

शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचे महत्त्व सांगताना ज्याच्याकडे गडकोट त्याचं राज्य मजबूत!! मात्र आता ह्या किल्ल्यावरती असणारा खंदक हा पूर्ण झाडाझुडपानी आक्रमण झालेला आहे ,आणि त्यामुळे या खंदकाची जागा एका कचराकुंडीत रूपांतरित व्हायच्या अगोदरच जेसीबीच्या साह्याने व्यवस्थितपणे हा खंदक खोलून घेऊन आणि स्वच्छता करून चारी बाजूने वाढलेली झाडीझूडपे काढून टाकून एक व्यवस्थित अशी रचना करण्याची गरज आहे. सरकारी कामासाठी इतका फंड असताना मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक बाबींच्या बाबतीत लोक सजग होत असताना पुरातत्त्व विभाग या बेळगावच्या किल्ल्याच्या बाबतीत मागे का ?हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे .

भुईकोट किल्ल्याच्या कोसळलेल्या तटबंदीतून आता पायवाट होऊ लागलेली आहे त्यामुळे या किल्ल्याचे अस्तित्व कमी किंवा नष्ट होण्याआधी पुरातत्त्व खाते असो बेळगाव जिल्हा प्रशासन असो किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असो किंवा गडकोट प्रेमी असो यांनी याकडे लक्ष देऊन ही समस्या सोडविणे आणि बेळगावचा भुईकोट किल्ल्याचे अस्तित्व अबाधित ठेवणे गरजेचे आहे.Fort bgm

एखादी वस्तू नीट निगराणी खाली ठेवली तर त्याचं आयुष्य वाढते. जर तिच्याकडे दुर्लक्ष झाले तर हळूहळू तिची पडझड व्हायला चालू होते आणि त्यानंतर पडझड रोखणं किंवा थांबवणे फार अशक्य होतं . म्हणून अजूनही बेळगावचा किल्ला मजबूत आहे काही ठिकाणी पडझड झाली तिथे डागडुजी केली तर तो अजून हजारो वर्षे त्याचं आयुष्य वाढवू शकतो आणि लोकांच्या पुढे इतिहास जागृत ठेवण्याचे काम करू शकतो.

त्यासाठी हया किल्लाचे संवर्धनीकरण सुशोभीकरण त्याचबरोबर ऐतिहासिकजागृती करणे काळाची गरज आहे .ज्या ज्या विभागाच्या आखत्यारीत हा किल्ला येतो त्यांनी यासाठी बेळगावकरांची साथ घेऊन आणि बेळगावकर नेहमीच अशा कामात अग्रेसर असतात त्या लोकांच्या बरोबरीने या किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

नूतन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या भुईकोट किल्ल्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशीही मागणी होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.