बेळगाव जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यात घडलेल्या 890 रस्ते अपघातांमध्ये एकूण 323 लोकांनी आपले प्राण गमावले असून 1344 जण जखमी झाले आहेत.
जिल्ह्यात गेल्या 1 जानेवारीपासून 31 मे 2023 या कालावधीत विविध ठिकाणी एकूण 890 रस्ते अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये 323 जणांना अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले असून 1344 जण गंभीर जखमी झाले आहेत.
तत्पूर्वी गेल्या 2022 मध्ये वर्षभरात बेळगाव जिल्हामध्ये गंभीर आणि सर्वसामान्य स्वरूपाचे एकूण 1934 रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातांमध्ये 747 जण ठार झाले होते.
अवैज्ञानिक पद्धतीने बांधलेले रस्ते, वेग मर्यादा नियमांचे उल्लंघन, रस्त्यावरील सिग्नल आणि दिशादर्शक न समजणे, श्रम -थकवा आणि मद्यपान ही रस्ते अपघात होण्यामागची प्रमुख कारणे असल्याचे बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.