Thursday, January 2, 2025

/

स्त्रियांप्रमाणे आम्हालाही सवलत द्या : मॅक्सी कॅब संघटनेची मागणी

 belgaum

सरकारने महिलांना मोफत बस प्रवास सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे खाजगी प्रवासी वाहतुकीला मोठा फटका बसला असून ऑटोरिक्षा चालकां मागोमाग आता मॅक्सी कॅब ओनर्स असोसिएशनने देखील त्या विरुद्ध आवाज उठविला आहे. तसेच सरकारने आमचाही विचार करून आमचा किमान रोड टॅक्स कमी करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात मध्यवर्तीय बस स्थानक येथे आज शुक्रवारी सकाळी बेळगाव लाईव्हशी बोलताना मॅक्सी कॅब ओनर्स असोसिएशन बेळगावचे अध्यक्ष संतोष कणेरी म्हणाले की, सरकारने महिलांना मोफत बस प्रवास योजना लागू केली त्याला आमचा विरोध नाही. मात्र महिलांप्रमाणे आम्हालाही सवलत मिळाली पाहिजे. कारण मॅक्सी कॅब धंदा पूर्वीसारखा राहिलेला नाही कोरोना काळापासून आम्ही कठीण परिस्थितीतून जात आहोत. कर्नाटक सरकार रोड टॅक्स सतत वाढवत आहे. हा टॅक्स आधी तीन महिन्याला 6500 रु. होता, तो सध्याच्या घडीला 18000 रुपये करण्यात आला आहे.

सध्याच्या महागाईत इतका टॅक्स आम्ही कसाबसा भरत असताना आता महिलांना बस प्रवास मोफत करून सरकारने आम्हाला आणखी संकटात टाकले आहे असे सांगून सरकारने आमचाही विचार करावा आणि मॅक्सी कॅबसाठी असलेला रोड टॅक्स कमी करावा, अशी आपल्या संघटनेची मागणी असल्याचे कणेरी यांनी स्पष्ट केले.Maxi cab

अन्य एका पदाधिकाऱ्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवास योजना लागू केली ही चांगली गोष्ट आहे. परंतु आमच्या मॅक्सी कॅब धंद्याचाही विचार झाला पाहिजे. महिलांना मोफत बस प्रवास योजना सुरू झाल्यामुळे आमच्या धंद्याला मोठा फटका बसला आहे. आमचा उदरनिर्वाह या धंद्यावर चालतो. याखेरीस सध्याच्या महागाईच्या दिवसात गाडीला येणारा खर्च आम्हाला परवडत नाही.

एकंदरच महिलांच्या मोफत बस प्रवास योजनेमुळे आमच्या धंद्याचे मोठे नुकसान होत आहे. तेंव्हा सरकारने याचा गांभीर्याने विचार करून यातून चांगला मार्ग काढावा. आमचा रोड टॅक्स कमी करावा, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी मॅक्सिकॅब ओनर्स असोसिएशन अध्यक्ष संतोष कणेरी, उपाध्यक्ष ईश्वर मासेकर ,परशराम तलवार, इरप्पा दुमनाईक, रमेश पाटील, बसवराज तलवार, किरण पाटील, हसन मुल्ला, इझाझ तासेवाले, मल्लप मेलेद, नागप्पा चंचडी यांच्यासह मॅक्सिकॅब चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.