नैऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून आता या 48 तासात संपूर्ण कर्नाटकात त्याचा प्रवेश होईल असा अंदाज आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
येत्या चार दिवसात कर्नाटकातील प्रामुख्याने मंगळूर, कारवार, चिक्कमंगळूर, उडपी, हासन, शिमोगा आणि कोडगू जिल्ह्यासह इतर ठिकाणी देखील जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान केरळमध्येच उशिराने मान्सून दाखल झाला.
त्यानंतर चार दिवसांनी बेळगावात पाऊस येईल असा हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र गेल्या शनिवारपासून ढगाळ वातावरण दिसत होते. त्यानंतर रविवारी सकाळी पाऊस झाला असला तरी तो तसा जोराचा नव्हता.
मान्सूनने काल रविवारी कर्नाटकचा अर्धा भाग, गोवा व्याप्त दक्षिण महाराष्ट्रापर्यंत धडक मारली आहे. आता राज्यातील हवामान खात्यानेही चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असल्यामुळे बेळगावातही त्याचे आगमन अपेक्षित आहे.