मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज शुक्रवारी राज्यातील जिल्हा पालकमंत्र्यांची यादी अधिकृतरित्या जाहीर केली आहे. त्यानुसार सतीश जारकीहोळी हे बेळगावचे तर लक्ष्मी हेब्बाळकर या उडपीच्या जिल्हा पालकमंत्री म्हणून कार्यभार पाहणार आहेत.
यापूर्वी सोशल मीडियावर राज्यातील जिल्हा पालक मंत्र्यांची एक यादी जाहीर झाली होती. त्या यादीत आणि या यादीमध्ये बराच फरक आहे. आज शुक्रवारी जाहीर झालेल्या यादीमध्ये बेळगाव जिल्हा पालकमंत्री पदी सतीश जारकीहोळी यांची तर उडपी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून लक्ष्मी हेब्बाळकर यांची नेमणूक झाली आहे.
याखेरीज धारवाड जिल्हा पालकमंत्री संतोष लाड तर बेंगलोर शहराचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री स्वतः डी के शिवकुमार असणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यालयातून जाहीर केलेली राज्यातील जिल्हा पालक मंत्र्यांची अधिकृत यादी खालील प्रमाणे आहे.
डी. के. शिवकुमार -बेंगलोर शहर, डाॅ. जी परमेश्वर -तुमकुर, एच. के. पाटील -गदग, के. एच. मुनियाप्पा -बेंगलोर ग्रामीण, रामलिंग रेड्डी -रामनगर, के. जे. जॉर्ज -चिक्कमंगळूर, एम. बी. पाटील -विजयपुरा, दिनेश गुंडुराव -मंगळूर, एच. सी. महादेवप्पा -म्हैसूर, सतीश जारकीहोळी -बेळगाव, प्रियांक खर्गे -कलबुर्गी, शिवानंद पाटील -हावेरी, बी. जमीर अहमद खान -विजयनगर, शरण बसप्पा दर्शनपूर -यादगिरी, ईश्वर बी. खंड्रे -बिदर, एन. चलूवरायस्वामी -मंडया, एस. एस. मल्लिकार्जुन -दावणगिरी, संतोष एस लाड -धारवाड, डॉ. शरण प्रकाश पाटील -रायचूर, आर. बी. तिम्मापूर -बागलकोट, के. वेंकटेश
-चामराजनगर, तगडगी शिवराज संगप्पा -कोप्पळ, डी. सुधाकर -चित्रदुर्ग, बी. नागेंद्र -बेळ्ळारी, के एस राजण्णा -हासन, पी. एस. सुरेश -कोलार, श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर -उडपी, मंकाळ वैद्य -कारवार, मधु बंगारप्पा -शिमोगा, डॉ. एम. सी. सुधाकर -चिक्कबेळ्ळापूर, एन. एस. बोसराजू -कोडगू