राज्यातील काँग्रेस सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या पाच गॅरंटी योजनांपैकी अन्नभाग्य योजना ठरल्याप्रमाणे उद्या 1 जुलैपासून राज्यभरात सुरू होणार असल्याचे अन्नपुरवठा खात्याचे मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी स्पष्ट केले आहे.
बेंगलोर येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मंत्रि मुनियप्पा यांनी अन्नभाग्य योजना उद्यापासून सुरू होईल आणि या योजनेअंतर्गत अतिरिक्त 5 किलो तांदळाच्या बदल्यात 5 किलो मोफत तांदूळ दिला जाईल.
मात्र अतिरिक्त 5 किलो तांदूळ वेळेपर्यंत लाभार्थींच्या खात्यावर पैसे जमा केले जातील असे सांगून राज्यातील 90 टक्के लोकांकडे बँक खाते असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
त्यामुळे ज्यांचे बँक खाते नाही त्यांनी त्वरित बँक खाते उघडावे, असे आवाहन मंत्र्यांनी केले आहे.