Tuesday, November 19, 2024

/

‘त्या’ स्वाभिमानी चिमुरड्याला मदतीचा ओघ सुरु!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : २७ मे रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात शहापूर येथील कोरे गल्ली परिसरात उभारण्यात आलेल्या कमानीवरील भगवा ध्वज कोसळला.

यादरम्यान याठिकाणी उपस्थित असलेला श्री खर्गेकर याने क्षणाचाही विलंब न करता धाडसाने भगवा ध्वज सुरक्षित ठिकाणी आणला. यादरम्यान या चिमुरड्याने भगव्यावरील प्रेम, निष्ठा आणि स्वाभिमानाचे दर्शन घडले. श्रीने केलेले हे कार्य एका व्हिडिओत कैद झाले आणि संपूर्ण बेळगावमध्ये हा व्हिडीओ तुफान वायरल झाला.

सामाजिक कार्यकर्त्यांनी व्हिडिओतील धाडसी चिमुरड्याचा शोध घेतला असता त्याचा पत्ता मिळाला. श्री खर्गेकर असे या चिमुरड्याचे नाव असून गेल्या ३ महिन्यांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. श्री खर्गेकर आपल्या मोठ्या भावासमवेत आणि आईसमवेत एका भाड्याच्या खोलीत रहात आहे. आधीच बेताची परिस्थिती आणि अशातच वडिलांचे छत्र हरपल्याने हि दोन्ही भावंडं सुरज कोल्ड्रिंक्स येथे काम करतात.

श्री खर्गेकर याच्या वायरल व्हिडिओनंतर समाजमाध्यमांवर त्याची मुलाखत घेतली असता त्याच्या कुटुंबाची परिस्थिती समोर आली. आणि यादरम्यान एका पाठोपाठ एक असा मदतीचा ओघ सुरु झाला. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी श्री खर्गेकर याच्या कुटुंबाच्या आर्थिक सहकार्यासाठी पुढाकार घेतला असून अमेरिका स्थित पंकज धामणेकर या बेळगावकरने दहा हजार रुपयांची मदत देऊ केली आहे.

धामणेकर यांच्यासह दत्ता जाधव, बंडू केरवाडकर, राजकुमार बोकडे, सुनील बोकडे, बाळू जोशी, प्रमोद गावडोजी, शाम मुचंडी, बळवंत शिंदोळकर, महादेव पाटील, विशाल कंग्राळकर, सुरज बसरीकट्टी, नारायण सांगावकर, गणेश विशाल खडकीकर, सुमन विशाल खडकीकर आदींनीही सहकार्यासाठी पुढाकार घेतला आहे.

बेळगावमधील ज्या दानशूर व्यक्तींना श्री खर्गेकर याच्या कुटुंबियाला आर्थिक सहकार्य करण्याची इच्छा असल्यास त्यांनी सुरज बसरीकट्टी यांच्या ८०९५४८६४३८ या मोबाईल क्रमांकावर फोन पे च्या माध्यमातून सहकार्य करू शकता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.