Thursday, December 26, 2024

/

भाग्यनगर येथील गुलमोहर झाडाची खुलेआम कत्तल

 belgaum

भाग्यनगर येथील ब्रह्मकुमारी केंद्रानजीक असलेल्या रस्त्या शेजारील एका पूर्ण वाढ झालेल्या गुलमोहोराच्या झाडाची आज सकाळपासून खुलेआम कत्तल सुरू झाली असून याबद्दल वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढळू लागला आहे. यंदा प्रदीर्घ लांबलेला मान्सूनचा पाऊस हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाची हानी होत आहे याची जाणीव असून देखील मनुष्य शहाणा झालेला नाही. बेळगाव शहरात त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. अलीकडच्या काळात शहरातील उष्मा कमालीचा वाढण्याबरोबरच शहर परिसरातील भूगर्भातील अंतरजल पातळी खालावली आहे. याला प्रामुख्याने बेसुमार वृक्षतोड कारणीभूत आहे.

तथापि दुर्दैवाने शहरातील झाडांची निष्कारण कत्तल करण्याचे सत्र अद्याप थांबलेले नाही. आज शुक्रवारी सकाळी भाग्यनगर येथील ब्रह्मकुमारी केंद्रानजीक रस्त्याशेजारी असलेले गुलमोहराचे पूर्ण वाढ झालेले झाड तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याबद्दल वरूण कारखानीस या वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्त्याने जाब विचारला असता सदर झाड कमकुवत झाल्यामुळे तोडण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तथापि प्रत्यक्षात ते पूर्ण वाढ झालेले गुलमोहराचे झाड भरभक्कम सुस्थितीत दिसत होते.Tree cut

ग्रीन सेव्हीअर संघटनेचे समीर मजली यांनी देखील या झाडाच्या मजबुतीला दुजोरा दिला आहे. थोडक्यात वनखात्याची उदासीनता आणि कांही स्वार्थी मंडळींमुळे आज शहरातील आणखी एका झाडाचा बळी घेतला जात असल्याबद्दल वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

भाग्यनगर येथील त्या गुलमोहराच्या झाडाची कत्तल होऊ नये त्यासाठी प्रयत्न करण्यास मी तयार होतो. मात्र स्थानिक नागरिकांपैकी कोणीही पुढे येण्यास तयार नसल्यामुळे माझा नाईलाज झाला, असे वरूण कारखानिस याने बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.