दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव, ज्योती करियर अकॅडमी बेळगाव, भाऊराव काकतकर महाविद्यालय बेळगाव, ज्योती पदवी पूर्व महाविद्यालय बेळगाव, वाय.सी.एम.यु. आणि माजी विद्यार्थी संघटना बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयएएस 2023-24 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींचा सत्कार सोहळा, मार्गदर्शन शिबिर आणि व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या (बी.के. कॉलेज) सभागृहात गेल्या सोमवारी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द. म. शिक्षण मंडळचे उपाध्यक्ष, म. ए. समितीचे नेते व मार्गदर्शक सल्लागार ॲड. राजाभाऊ पाटील हे होते. प्रारंभी वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
त्यानंतर व्यासपीठावरील यु पी एस सी परीक्षा उत्तीर्ण मुडलगी तालुक्यातील श्रृती यरगट्टी, डेप्युटी डायरेक्टर स्टेट अकाउंटंट अँड ऑडिट डिपार्टमेंट कर्नाटक गव्हर्नमेंट प्रोबेशनरी श्रीमती नाझिया इक्बाल पटवेगार, बँक परीक्षेत उत्तीर्ण झालेली अधिकारी प्रतीक्षा पाटील आणि रेल्वे खात्यात टीसी म्हणून कार्यरत असलेले प्रकाश पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींचा देखील सन्मान करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्तींच्या व्याख्यानांसह मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. कार्यक्रमास डॉ. विक्रम एल. पाटील, प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, प्रा. अमित सुब्रमण्यम, प्राचार्य डॉ. आर. डी. शेलार, प्राचार्य आनंद पाटील, प्राचार्य डॉ. बसवराज कोळुचे, निवृत प्राचार्य डॉ. डी. एन. मिसाळे, कवी प्रा. निलेश शिंदे, प्रा. डॉ. आय. बी. वसुलकर, प्रा. डॉ. डी. टी.पाटील, प्रा डॉ निता पाटील, प्रा. डॉ अनिता पाटील, प्रा. डॉ. एम. एस.पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक प्रा. डॉ.एम. व्ही. शिंदे, ए.के.पाटील शिवानंद यरगट्टी, अरुण यरगट्टी, प्रा. डॉ. अमित चींगळी, प्रा. सूरज पाटील, प्रा. नारायण तोराळकर, योगेश मुतगेकर, अझर मुल्ला आदींसह बहुसंख्य विद्यार्थी -विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. शुभम चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचलन शिवानी गायकवाड यांनी केले. तर प्रा. अमित सुब्रमण्यम यांनी आभार मानले.