Wednesday, November 20, 2024

/

मंदिराच्या मालमत्तेवरून चिगुळे गावात मारामारी; ८ जण ताब्यात

 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापुर तालुक्यातील चिगुळे गावात मंदिराच्या मालमत्तेवरून दोन गटात झालेल्या मारामारीप्रकरणी ८० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

खानापूर तालुक्यातील चिगुळे गावात झालेल्या मारामारीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी गावातील माउली मंदिराजवळ कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून दोन्ही गटातील प्रत्येकी ४० जणांसह एकूण ८० जणांविरोधात तक्रार करण्यात आली आहे.

त्यापैकी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ४७ जण फरार आहेत. मारामारीत जखमी झालेल्या २५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.