बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून बेळगावचे अभिषेक जाधव यांची नियुक्ती झाली असून अभिषेक जाधव यांचा दिल्ली मुक्कामी सत्कार करण्यात आला. ह.भ.प. शंकर बाबली आणि म. ए. समितीचे युवा कार्यकर्ते सागर पाटील यांनी अभिषेक जाधव यांचा सत्कार केला.
अभिषेक जाधव यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली प्रतिनिधीपदी निवड झाली असून त्यांना दिल्ली येथील न्यू महाराष्ट्र सदनात विशेष कक्ष स्थापून देण्यात आला आहे.
या माध्यमातून केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचे समन्वयक म्हणून ते काम पाहणार आहेत.
या सत्काराला उत्तर देताना अभिषेक जाधव यांनी बेळगावप्रश्नी भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले .
यावेळी बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी, जाधव यांचे सहकारी एच एस. सिंह चौहान आदी उपस्थित होते. अभिषेक हे बेळगावचे दत्ता जाधव यांचे ते सुपुत्र आहेत.