बेळगाव लाईव्ह : जगभरात थैमान घातलेल्या आणि जागतिक अर्थव्यवस्था विस्कळीत करणाऱ्या विनाशकारी कोविड पर्वाचा अंत झाल्याची मोठी घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.
कोरोना हि महासाथ असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं होतं. कोरोनामुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. परंतु आता हि महासाथ संपल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.
यासंदर्भात बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष ट्रेडोस एडनॉम गेब्रेयसस म्हणाले, “जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीची १५ वी बैठक नुकतीच पार पडली.
सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून कोरोनाचा अंत झाल्याची घोषणा केली जावी असं मला सांगण्यात आलं. मि त्यांचा सल्ला स्वीकारला असून आता मोठ्या आशेनं मी जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून कोरोनाचा अंत झाल्याचं जाहीर करतो. पण याचा अर्थ कोरोना पूर्णपणे संपला असं होत नाही.”
जागतिक आरोग्य संघटनेनं ३० जानेवारी २०२० रोजी कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटनुसार कोरोनामुळे आतापर्यंत ७० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने मोठी घोषणा करत कोरोना जागतिक महासाथ म्हणून संपल्याची घोषणा केली आहे.