Saturday, January 4, 2025

/

वळीवामुळे कोथिंबीर पिकाचे नुकसान; शेतकऱ्यांना फटका

 belgaum

बेळगाव शहर परिसराला काल सोमवारी झोडपलेल्या वळीव पावसामुळे वडगाव, शहापूर शिवारातील कोथिंबीर पीक भुईसपाट झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

वडगाव, शहापूर शिवारातील शेतकऱ्यांनी मोसमानुसार नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कोथिंबीरसह अन्य भाजीपाला पीक घेतली आहेत. मात्र काल सोमवारी झालेल्या वळीव पावसामुळे कोथिंबीर पीक भुईसपाट झाले आहे. त्याचप्रमाणे शिवारात मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेला भाजीपाल्याच्या शेतात काल पाणी तुंबले होते.Crop loss

पावसामुळे कोथिंबीर पीक खराब झाले असून वडगाव, शहापूर शिवारातील शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दरवेळी वळीवानंतर शेती मशागतीच्या कामांनाही चालना दिली जाते.

पावसाळ्यापूर्वी धुळवाफ पेरणी केली जाते. आता काल वळीवाने लावलेल्या हजेरीमुळे धूळवाफ पेरणीलाही सुरुवात होण्याची शक्यता आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.