बेळगावसह संपूर्ण कर्नाटकात येत्या 10 मे रोजी विधानसभा निवडणुक -2023 चे मतदान होणार आहे. त्यामुळे मतदार यादीत तुमचे नांव आहे की नाही? याची पडताळणी करून घेणे गरजेचे आहे. लक्षात घ्या जर तुमचे नांव यादीत नसेल तर मतदार ओळखपत्र असून देखील तुम्ही मतदान करू शकणार नाही.
भारतीय निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर 2023 सालची मतदार यादी अलीकडेच जाहीर केली आहे. या मतदार यादीतील आपले नांव तपासणे /शोधण्यासाठी : https://electoralsearch.in/ या ठिकाणी भेट द्या. येथे तुमच्या ईपीआयसी नंबर (तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक) अथवा नावाच्या माध्यमातून सर्च ऑप्शनद्वारे आपल्या नावाची पडताळणी करा. ईपीआयसी नंबरद्वारे नांव शोधणे खूप सोपे आहे किंवा दोन्ही गुगल प्ले स्टोअरवर व्होटर हेल्पलाइन मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध आहेत : https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen&hl=en_IN
ॲपल ॲप स्टोअर : https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004
तुम्ही प्रत्यक्ष मतदार यादीची पीडीएफ फाईल देखील बघू शकता. मात्र त्यासाठी मतदान केंद्रनिहाय जाऊन कोणत्याही सर्च ऑप्शनशिवाय करावे लागणारे काम कंटाळवाणे आहे. या ठिकाणी जा : https://ceo.karnataka.gov.in/FinalRoll_2023/AC_List.aspx?DistNo=1 तुमच्या मतदारसंघावर क्लिक करा. तुमच्या मतदार केंद्रावर क्लिक करा. ज्यामुळे पीडीएफ फाईल ओपन होईल आणि मग त्यामध्ये तुमच्या नावाचा शोध घ्या.