बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

0
7
Puc 2 exam start
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून येत्या २३ मे पासून पुरवणी परीक्षेला विविध केंद्रांवर सुरुवात होणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी महत्त्वाची असणारी सीईटी २० ते २२ मेपर्यंत होणार आहे. त्यामुळे बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

बदललेल्या वेळापत्रकानुसार २३ मे रोजी कन्नड, अरेबिक, २४ मे रोजी रसायन शास्त्र, बेसिक गणित, २५ मे रोजी इंग्रजी, माहिती तंत्रज्ञान रिटेल, २६ मे रोजी समाज शास्त्र, २७ मे रोजी इतिहास, संख्या शास्त्र, २९ मे रोजी हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम,

उर्दू, संस्कृत, फ्रेंच, ३० मे रोजी भूगोल शास्त्र, मानसशास्त्र, भौतिकशास्त्र, ३१ मे रोजी अर्थशास्त्र, भूगर्भ शास्त्र, शिक्षण शास्त्र, गृह विज्ञान, १ जून रोजी गणित, राज्यशास्त्र, २ जून रोजी तर्कशास्त्र, पॉलिटिकल सायन्स, ३ जून रोजी अर्थ शास्त्र, जीव शास्त्र असे पेपर घेण्यात येणार आहेत.

 belgaum

९ ते २९ मार्चपर्यंत बारावीची परीक्षा झाली होती. काही दिवसांतच पेपर तपासणीचे काम करून १५ दिवसांत बारावीचा निकाल जाहीर केला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी २२ मेपासून पुरवणी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र २०, २१ व २२ मे रोजी सीईटी होणार आहे. त्यामुळे परीक्षा वेळापत्रक बदल केला असून, जे विद्यार्थी सीईटी देणार आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेचा निकाल ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.