Monday, November 25, 2024

/

तिरुपती, जयपूर विमानांना विलंब प्रवाशात तीव्र नाराजी

 belgaum

बेळगाव मधून उड्डाण करणारी बरीच विमाने वेळेत दाखल होत नसल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत असून काल बुधवारी तिरुपती व जयपूर या दोन्ही शहरांना जाणाऱ्या विमानांना विलंब झाल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

बेळगाव -तिरुपती या मार्गावर उड्डाण केलेले विमान काल बुधवारी सकाळी 9:15 वाजता दाखल होणार होते. त्यामुळे प्रवासी सकाळी 7 वाजल्यापासून विमानतळावर दाखल झाले. मात्र दुपारी 1 वाजला तरी विमानाचा पत्ता नसल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

तब्बल चार तास विमानाला उशीर झाल्याने प्रवाशांचे पुढील प्रवासाचे वेळापत्रक कोलमडले. परिणामी प्रवासी व विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. बेळगाव -जयपुर मार्गावर दोनच दिवसापूर्वी नवीन विमान फेरी सुरू झाली. तथापि उद्घाटन झाल्यानंतर दुसरा फेरीत हे विमान दीड तास उशिराने दाखल झाले. महिनाभरापूर्वी ज्यादा दराने तिकीट बुकिंग करूनही प्रवास मात्र उशिरानेच होत असल्याने संबंधित कंपन्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

दरम्यान, बेळगाव विमानतळावर स्टार एअरचा संपूर्ण सावळा गोंधळ -गैरवस्थापन असल्याचा आरोप राजेश हेडा यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. आजचे जयपूर विमानाला उड्डाण करण्यास जवळपास 90 मिनिटे उशीर झाला आहे. आम्ही विमानामध्ये गेल्या 40 मिनिटांपासून बसून आहोत. विमान उड्डाणाचा पत्ता नाही. कर्मचारी मात्र इकडून तिकडे धावाधाव करत आहेत असे हेडा यांनी म्हंटले आहे. त्याला एकाने पायलेट बहुदा कुंदा आणायला गेला असेल असे मुश्किल उत्तर दिले आहे.Star air

अन्य एकाने हा विश्वासाचा प्रश्न आहे. तेंव्हा तुम्ही तुमची सेवा सुधारावी असा सल्ला स्टार एअरला दिला आहे. देसी बॅटमॅन या नेटकऱ्याने अशी पार्श्वभूमी चांगली नसलेल्या एअरलाइन्समधून प्रवासच न केलेला बरा असा सल्ला दिला आहे. राजेश हेडा यांच्या तक्रारीला स्टार एअरच्या ऑफिशियल साईट वरून उत्तर देण्यात आले आहे की विलंब निराशाजनक असल्यामुळे आमची त्याबद्दल सहानुभूती आहे. मात्र हा विलंब कांही तांत्रिक कारणास्तव झाला आहे.

कृपया तुम्ही आम्हाला आमच्या कस्टमर केअर नंबरवर संपर्क साधावा धन्यवाद, असे उत्तर दिले आहे. स्टार एअर विमान उड्डाण विलंबाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सुमित दिवटगी यांनी हे पहिल्यांदाच घडत नाही. अलीकडे विमानाला विलंब होण्याचा किंवा ते रद्द होण्याचा प्रकार मी वारंवार अनुभवला आहे असे स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.