बेळगाव लाईव्ह : राज्याच्या राजकारणात जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व मोठे आहे. राजकारणातील महत्वाचे व्यक्तिमत्व मानल्या जाणाऱ्या जारकीहोळी बंधूंपैकी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी आजवर बेळगावसह राज्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. शनिवारी जाहीर झालेल्या निकालालनंतर त्यांची बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निर्णय लागण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगावच्या राजकारणात नेहमीच किंगमेकरची भूमिका बजावणाऱ्या सतीश जारकीहोळींनी यावेळीदेखील आपला करिष्मा दाखविला असून स्वतःच्या विजयासह बेळगावमधील १० आमदारांना देखील विजयश्री मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात त्यांनी जिल्हा पालकमंत्रिपद भूषविले होते.
त्यानंतर राज्यात आलेल्या राजकीय भूकंपानंतर भाजपने आपली सत्ता स्थापन केली होती. मात्र पुन्हा २०२३ सालच्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ता पालटली असून आता पुन्हा एकदा सतीश जारकीहोळी मंत्रीपदी विराजमान होणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सतीश जारकीहोळी यांनी आजवर वन आणि पर्यावरण मंत्री, उत्पादन शुल्क मंत्रीपदी देखील कामकाज पाहिले असून आता नव्या मंत्रिमंडळात त्यांच्यावर कोणत्या खात्याच्या जबाबदारी सोपविली जाईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
100% even Laxmitai Hebalkar madam also note down sir.