बेळगावकरांची शिवभक्ती, बेळगावकरांचे हिंदूत्व आणि शिवभक्तांचे भगव्यावरील प्रेम जगजाहीर आहे.
बेळगावात छत्रपती शिवराय आणि भगव्याच्या बाबतीत उत्तुंग प्रेम निष्ठा आणि स्वाभिमान पहायला मिळतो अन् त्याची झलक रविवारच्या पावसात पाहायला मिळाली. कोरे गल्ली कॉर्नर (शहापूर) येथे पावसात कमानीवरील भगवा ध्वज कमानीसह खाली पडला. यावेळी आनंदवाडी येथील विशाल खर्गेकर या बाल मावळ्याने पावसाची तमा न बाळगता भिजत झेंडा उचलला होता.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्या मुलाचे गल्लीतील नागरिकांनी कौतूक केल आहे.
खरोखर मनापासून त्या मुलाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे तरी सर्व मराठी माणसा असो हिंदू माणसा असो तर त्याच्यासाठी अभिनंदनचा वर्षाव करावा असं मी माझी महापौर विजय मोरे यांना सर्वांना विनंती करतो आणि त्या मुलाचा सत्कार नक्कीच केला पाहिजे अश्या शब्दात माजी महापौर विजय मोरे यांनी त्या केले आहे.
मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य समन्वयक दिलीप पाटील यांनी “म्हणजे बेळगाव मध्ये भगवा सुरक्षित हातात आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या शिवाय सतीश रेडेकर यांनी प्रेम निष्ठा स्वाभिमान..वादळाशी झुंज तोच देऊ शकतो ज्याच्या मनात अन् रक्तात भगवा आहे अशी
तर रुपेश कंग्राळकर यांनी इतका एकनिष्ठपणा जनतेने निवडणुकीत दाखवला असला तर एक तरी मराठी आमदार निवडून आला असता अशी खोचक भावना देखील सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे.