बेळगाव जिल्ह्यात चुरशीने झालेल्या मतदानाची मोजणी शनिवारी (दि. 13) होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत. शनिवारी दुपारपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
बेळगाव जिल्ह्यात एकूण 76.70 टक्के मतदान झाले असून सर्व ईव्हीएम आरपीडी कॉलेजमधील स्ट्राँगरुममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत.
शनिवारी होणार्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.
शनिवारी होणार्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उद्या पुन्हा एकदा निवडणूक अधिकारी व कर्मचार्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ करण्यात येईल. सेवा मतदारांची संख्या 26 हजारहून अधिक आहे. त्यांच्या मोजणीसाठी 1 टेबलची व्यवस्था केली आहे. पोस्टल बॅलेट्सची मोजणी सर्वात आधी करण्यात येईल.
त्यासाठी 2 टेबल्स निश्चित केले आहेत. सर्व 18 मतदारसंघांसाठी प्रत्येकी 2 टेबल्स अशी एकूण 36 टेबल्स मांडून मतमोजणी करण्यात येईल. त्यानंतर जसजशी मतमोजणी पूर्ण होईल तसतसे निकाल जाहीर करण्यात येतील, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघात काल शांततेत मतदान पार पडले. त्यानंतर सर्व 18 निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपेट्या राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये स्थापन केलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये आणल्या. आज पहाटेपर्यंत ही प्रक्रिया सुरु होती. सर्व उमेदवार आणि त्यांचे राजकीय पक्षांचे एजंट यांच्या उपस्थितीत आज छाननी प्रक्रिया पार पडेल. मतदानापूर्वी प्रात्यक्षिक मतदान घेऊन ईव्हीएम क्लिअर करण्यात आले होते.
त्याबाबत काही ठिकाणाहून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे उमेदवार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम क्लिअरिंग प्रक्रिया पार पाडण्यात येईल. शनिवारी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उद्या पुन्हा एकदा निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
व्होटर्सची संख्या 26 हजारहून अधिक आहे.