उगार खुर्द ते विजयनगर दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरण अभियांत्रिकीकरणाचे काम सुरू असल्यामुळे कांही रेल्वे सेवा रद्द करण्याबरोबरच कांही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे काहींच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पुढील प्रमाणे आहे.
रद्द झालेल्या रेल्वे सेवा : 1) रेल्वे क्र. 17332 एसएसएस हुबळी -मिरज डेली एक्सप्रेस उद्या 28 मे पासून 6 जून 2023 पर्यंत रद्द. 2) रेल्वे क्र. 17331 मिरज -एसएसएस हुबळी डेली एक्सप्रेस येत्या 30 मे पासून 7 जून 2023 पर्यंत रद्द. 3) रेल्वे क्र. 07351 मिरज -लोंढा डेली एक्सप्रेस स्पेशल उद्या 28 मे 2023 रोजी रद्द.
4) रेल्वे क्र. 17333 मिरज -कॅसलरॉक डेली एक्सप्रेस 29 मे पासून 6 जून 2023 पर्यंत रद्द. 5) रेल्वे क्र. 17334 कॅसलरॉक -मिरज डेली एक्सप्रेस 29 मे पासून 6 जून 2023 पर्यंत रद्द.
अंशतः रद्द होणाऱ्या रेल्वे सेवा :1) रेल्वे क्र. 17415 तिरुपती -श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) हरिप्रिया एक्सप्रेस ही तिरुपती येथून निघणारी रेल्वे उद्या 28 मे ते 5 जून 2023 या कालावधीत बेळगाव कोल्हापूर दरम्यान अंशतः रद्द केली जाणार असून ती बेळगाव येथे थांबवली जाईल.
2) रेल्वे क्र. 17416 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) -तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस ही कोल्हापूर येथून 29 मे ते 6 जून 2023 या कालावधीत प्रवासाला निघणारी रेल्वे कोल्हापूर -बेळगाव दरम्यान अंशतः रद्द केली जाणार आहे. ही रेल्वे सेवा कोल्हापूर ऐवजी बेळगाव येथून सुरू होईल.
रेल्वेचे नियमन/पुनर्निर्धारण : 1) रेल्वे क्र. 16590 मिरज -केएसआर बेंगलोर राणी चन्नम्मा एक्सप्रेस ही मिरजेपासून प्रवासास निघणारी रेल्वे 29 मे तसेच 2, 3 व 6 जून 2023 या दिवशी 120 मिनिटं उशिरा प्रवासाला निघेल. 2) रेल्वे क्र. 16590 मिरज -केएसआर बेंगलोर राणी चन्नम्मा एक्सप्रेस ही रेल्वे 30 व 31 मे रोजी तसेच 1, 4 आणि 5 जून 2023 रोजी 30 मिनिटे उशिरा धावेल.

3) रेल्वे क्र. 12630 हजरत निजामुद्दीन -यशवंतपुर एक्सप्रेस या हजरत निजामुद्दीन येथून निघणाऱ्या रेल्वेचे 2 जून रोजी मिरज येथे 60 मिनिटांसाठी नियमन केले जाणार आहे.
4) रेल्वे क्र. 11098 एर्णाकुलम -पुणे एक्सप्रेस या 5 जून रोजी एर्णाकुलम येथून प्रवासास निघणाऱ्या रेल्वेचे मिरज येथे 40 मिनिटांसाठी नियमन केले जाईल. 5) रेल्वे क्र. 16542 पंढरपूर -यशवंतपुर एक्सप्रेस ही 2 जून 2023 रोजी पंढरपूर येथून प्रवासास निघणारी रेल्वे 60 मिनिटे उशिरा धावेल.