Saturday, December 21, 2024

/

कर्नाटक मंत्रिमंडळाचे ‘असे’ आहे खातेवाटप

 belgaum

कर्नाटकातील काँग्रेस मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह एकूण 34 कॅबिनेट मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे.

यामध्ये यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना सार्वजनिक बांधकाम खाते तर बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना महिला आणि बालकल्याण, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण खाते मिळाले आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह 34 कॅबिनेट मंत्र्यांचे खातेवाटप पुढील प्रमाणे आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या :अर्थ, कॅबिनेट घडामोडी कर्मचारी आणि प्रशासकीय सुधारणा खाते, गुप्तचर, माहिती आणि शिष्टाचार. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार :प्रमुख आणि मध्यम पाटबंधारे, बेंगलोर विकास. डॉ. जी. परमेश्वर :गृह (गुप्तचर वगळून),

एच. के. पाटील :कायदा आणि संसदीय कामकाज, संसदीय लघु पाटबंधारे. के. एच. मुनियप्पा :अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक कामकाज. के. जे. जॉर्ज :ऊर्जा. एम. बी. पाटील :बृहत आणि मध्यम उद्योग, आयटी आणि बीटी. रामलिंग रेड्डी :वाहतूक. सतीश जारकीहोळी :सार्वजनिक बांधकाम. प्रियांक खर्गे :ग्रामीण विकास आणि पंचायत राज. बी. झेड. जमीर अहमद खान :गृहनिर्माण, वक्फ आणि अल्पसंख्यांक.

कृष्णा भेरेगौडा :महसूल (मुजराई वगळून), दिनेश गुंडुराव :आरोग्य आणि कुटुंब कल्याण. एन. चलुवरयस्वामी :कृषी. के. वेंकटेश :पशुपालन आणि रेशीम उद्योग. एच. सी. महादेवप्पा :समाज कल्याण. ईश्वर खांड्रे :वन आणि पर्यावरण. के. एन. राजण्णा :सहकार. शरणबसप्पा दर्शनपूर :लघुउद्योग, सार्वजनिक क्षेत्र उद्योग. शिवानंद पाटील :वस्त्रोद्योग, ऊस विकास आणि साखर संचलनालय, सहकार खात्याकडून कृषी व्यापार.

आर. बी. तिम्मापूर :अबकारी आणि मजुराई. एस. एस. मल्लिकार्जुन :खाण आणि भूगर्भ, फलोत्पादन. शिवराज तंगडगी :मागासवर्ग आणि अनुसूचित जमाती कल्याण. शरण प्रकाश पाटील :उच्च शिक्षण. मनकल वैद्य :मत्स्यव्यवसाय आणि बंदर, अंतर्गत वाहतूक.

लक्ष्मी हेब्बाळकर :महिला आणि बालकल्याण, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण. रहीम खान :पालिका प्रशासन, हज. डी. सुधाकर :पायाभूत विकास, नियोजन आणि आकडेवारी. संतोष लाड :कामगार आणि कौशल्य विकास. एन. एस. बोसराजू :पर्यटन, विज्ञान आणि तंत्रज्ञान.

भैरती सुरेश :शहर विकास आणि गाव नियोजन (बेंगलोर विकास बीडब्ल्यूएसएसबी, बीएमआरडीए, बीएमआरसीएल वगळता केयुडब्ल्यूएसडीबी, केयुआयडीएफसी यांचा समावेश) मधु बंगारप्पा :प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण. डॉ. एम. सी. सुधाकर :वैद्यकीय शिक्षण. बी. नागेंद्र : युवजन सेवा, क्रीडा आणि कन्नड संस्कृती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.