बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागात रेशन तांदळामध्ये प्लास्टिक तांदूळ आढळून आला असून लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बेकायदेशीर रित्या बीपीएल कार्डचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांविरोधात कडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र अलीकडे रेशन तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ आढळत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
प्लास्टिकचा तांदूळ वितरित करून हा नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
मागील काही महिन्यांपासून रेशनच्या तांदळात प्लास्टिक तांदूळ मिसळल्याने प्रकार पुढे आले असून अनेक अनभिज्ञ लाभार्थी याचे सेवन करत आहेत.
हा तांदूळ पाण्यात भिजवल्यानंतर रबरप्रमाणे ताणाला जात असून शिजवल्यानंतरदेखील तांदूळ वेगळा दिसत आहे. अशा घातक तांदळामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून याबाबत तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.