कर्नाटकात काँग्रेसचे सत्ता आल्यानंतर अखेर सत्तेचा तिढा सुटला असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांच्यासह पहिल्या टप्प्यात आठ जण मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
शनिवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात जम्बो मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार होता मात्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी जाहीर केलेल्या सुची नुसार सी एम डी सी एम सह आठ जण कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या दुसऱ्यांदा तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत. बंगळुरु शहरातील कंठीरवा स्टेडियमवर दुपारी 12.30 वाजता शपथविधी सोहळा होणार असून राज्यपाल थावरचंद गेहलोत त्यांना शपथ देतील.
सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यासह 10 आमदार शपथ घेणार आहेत. त्यापैकी फक्त 8 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. डॉ.जी.परमेश्वर, के.एच.मुनिअप्पा, के.जे.जॉर्ज, एम.बी. पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियांक खर्गे, रामलिंगारेड्डी, जमीर अहमद हे शपथ घेणार आहेत.
पहिल्या टप्प्यात जंबो मंत्री मंडळ शपथ घेणार असल्याची माहिती समोर होती मात्र इच्छुकांची भाऊगर्दी लक्षात घेता काँग्रेस हाय कमांडने सावध पाऊले उचलत मुख्यमंत्री उपमुख्यंत्र्यांसह सह केवळ आठ मंत्र्यांना शपथ देण्याचे ठरवले असल्याची माहिती समोर येत आहे.बेळगाव जिल्ह्यातून केवळ सतीश जारकीहोळी मंत्री बनणार असल्याने तेच पालकमंत्री बनतील आहे दाट शक्यता व्यक्त होत आहे.
कर्नाटकात सिद्धरामय्या डी के शिव कुमार सह दहा जण घेणार शपथ बेळगाव जिल्ह्यातून सतीश जारकीहोळी होणार कॅबिनेट मंत्री pic.twitter.com/9dtJ9zunGM
— Belgaumlive (@belgaumlive) May 20, 2023