कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यामध्ये आज बुधवारी दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 37.01 टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील या तिसऱ्या सत्रात 45.2 टक्के इतके सर्वाधिक मतदान कुडची मतदारसंघात झाले असून सर्वाधिक कमी मतदान रामदुर्गमध्ये 27.15 टक्के इतके नोंद झाले आहे.
मतदानाच्या तिसऱ्या सत्रात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार असलेल्या बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण, यमकनमर्डी आणि खानापूर मतदार संघामधील मतदानाच्या टक्केवारीतही मोठी वाढ झाली आहे.
तिसऱ्या सत्रात यमकनमर्डी येथे 44.52 टक्के, बेळगाव उत्तर येथे 32.26 टक्के, बेळगाव दक्षिण येथे 33.63 टक्के, बेळगाव ग्रामीण येथे 35.78 टक्के आणि खानापूर येथे 36.42 टक्के इतके मतदान झाले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आज दुपारी 1 वाजेपर्यंतच्या तिसऱ्या सत्रातील मतदानाची जिल्ह्यातील मतदार संघ निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे आहे.
निपाणी :38.7 टक्के, चिक्कोडी -सदलगा :42.3 टक्के, अथणी :41.05 टक्के, कागवाड :43.26 टक्के, कुडची :45.2 टक्के, रायबाग :32.25 टक्के, हुक्केरी :39.08 टक्के, अरभावी :37.76 टक्के, गोकाक :39.3 टक्के, यमकणमर्डी :40.52 टक्के, बेळगाव उत्तर :32.26 टक्के, बेळगाव दक्षिण :36.63 टक्के, बेळगाव ग्रामीण :35.78 टक्के, खानापूर :36.42 टक्के, कित्तूर :38.3 टक्के, बैलहोंगल :37 टक्के, सौंदत्ती -यल्लमा :36.49 टक्के आणि रामदुर्ग 27.15 टक्के.