Tuesday, January 7, 2025

/

‘त्या’ व्हिडीओसंदर्भात आम. राजू सेठ यांचा खुलासा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून बेळगाव उत्तर मतदार संघात काँग्रेसचे असिफ उर्फ राजू सेठ यांनी बाजी मारली आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर आरपीडी महाविद्यालय परिसरात राजू सेठ समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला असून यासंदर्भात आमदार राजू सेठ यांनी खुलासा केला आहे.

मतमोजणी निकालाबाहेरील व्हिडीओ जो वायरल करण्यात आला आहे, तो फेक असल्याचे राजू सेठ यांनी सांगितले आहे. या व्हिडीओ प्रकरणी चौकशी करण्यात येणार असून दोषींविरोधात कठोर पावले उचलली जाणार असल्याचेही राजू सेठ यांनी सांगितले.

उत्तर मतदार संघातील जनतेने आपल्यावर विश्वास दाखवून आपल्याला विजयी केले, याबद्दल मी त्यांचा आभारी असून माझ्या मतदार संघातील विकासकामांसंदर्भात कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता आपण कार्यरत राहणार असल्याचे राजू सेठ यांनी सांगितले.

आपला देश महान आहे. सदर व्हिडीओ वेगाने वायरल होत असून अशा पद्धतीचा व्हिडीओ आपल्या निदर्शनात आल्यास तो पुढे फॉरवर्ड करू नये, आणि आपण सर्वधर्मसमभाव या भावनेने सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या विचारांचे असून व्हिडीओ वायरल करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी पाऊले उचलण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचा विजय ऐतिहासिक : आम. लक्ष्मी हेब्बाळकर

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसचा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय झाला असून आपण जनतेला दिलेली पाच आश्वासने लवकरच पूर्ण करणार असा विश्वास आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बोलून दाखविला. आज बंगळुरूला रवाना होण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या आणि आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली ११ मतदार संघात काँग्रेसचा विजय झाला आहे. हा विजय बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणाच्या इतिहासातील अभूतपूर्व विजय असल्याचे त्या म्हणाल्या.

बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसने दिलेल्या लढतीनंतर मिळविलेल्या यशाबद्दल आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा केली आहे. जिल्ह्याचे नेतृत्व आणि एकजूट हि काँग्रेसच्या विजयाची प्रमुख कारणे असून बेळगाव जिल्ह्याला किती मंत्रीपदे मिळू शकतात हे पाहावे लागेल, अशी प्रतिक्रियाही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.