आगामी २७ मे रोजी होणाऱ्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पाश्वभूमीवर खडे बाजार पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. विधान सभा निवडणुकीच्या आचारसंहिते मुळे यंदा शिवजयंती मिरवणूक झाली नव्हती त्यामुळे 27रोजी सदर चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे याच पाश्र्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती.
शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत डॉल्बी लावू नये आणि शांततेत मिरवणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन खडे बाजार पोलीस उपायुक्त अरुण कुमार कोळळूर यांनी केले.मध्यवर्ती शिवजयंती महा मंडळाच्या पदाधिकाऱ्या सोबत खडे बाजार पोलिसांनी शांतता समिती बैठक केली.यावेळी पोलीस निरीक्षक रत्न कुमार उपनिरीक्षक उपस्थित होते.
आता पर्यंत 58 चित्ररथ मंडळांनी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी नावं नोंदवली असून एकूण 85चित्ररथ सहभागी होतील अशी माहिती शिव जयंती मंडळाचे जन संपर्क अधिकारी विकास कलघटगी यांनी दिली.
शनिवारी सायंकाळी सात वाजता नरगुंदकर भावे चौकात पालखी पूजन होईल त्यानंतर मारुती गल्ली,हुतात्मा चौक,रामदेव गल्ली संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली,कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक,रामलिंग खिंड गल्ली,टिळक चौक,हेमू कलानी चौक पाटील गल्ली शनी मंदिर,कपिलेश्वर मंदिर ब्रीज जवळ मिरवणुकीची सांगता होईल अशी माहिती देण्यात आली.
यावेळी रणजित चव्हाण पाटील,विजय जाधव, प्रवीण तेजम आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.