बेळगाव लाईव्ह : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती.
या बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घनकचरा विल्हेवाट युनिटसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध कामांसाठी तातडीने निविदा मागवून कामाला सुरुवात करावी, काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने बिल अदा करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या.
एनजीटी कचरा संकलन, वर्गीकरण आणि विल्हेवाटीची प्रक्रिया मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पाडावी, शेजारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी क्लस्टर करून कचरा विल्हेवाट लावण्याची युनिट्स स्थापन करावीत.
ग्रामपंचायत पद उपलब्ध असल्यास त्यांच्यासह क्लस्टर स्थापन करता येईल, याचप्रमाणे नाले, गटारे, नाल्यांसह सर्व ठिकाणाहून पावसाचे पाणी वाहून जावे, यासाठी सर्व स्थानिक संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी स्वच्छता करावी, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या आहेत.
सर्व नाले व मोठे नाल्यांचे गाळ काढावेत, जेणेकरून पाणी सहज वाहून जाण्यास मदत होते. रस्ते, ड्रेनेज व इतर कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. विजेचे खांब चांगल्या स्थितीत असावेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कार्यवाही करावी, पावसाळ्यात प्रत्येक मुख्याधिकारी केंद्रीय पदावर असणे आवश्यक आहे अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
यावेळी जिल्हा नागरी विकास कक्षाचे प्रकल्प संचालक डॉ. ईश्वर उळागड्डी यांनी, एनजीटी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत बेळगावचे उपविभागीय अधिकारी बाळाराम चव्हाण, बैलहोंगल उपविभागीय अधिकारी, जिल्ह्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्य अधिकारी व अभियंते सहभागी झाले होते.