Wednesday, January 8, 2025

/

हायकमांडकडून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊनच : लक्ष्मण सवदी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील एकूण १८ विधानसभा मतदार संघापैकी तब्बल ११ जागांवर काँग्रेसनी बाजी मारली असून उद्या विधानभवनात विजयी आमदारांसमवेत बैठक होणार आहे. दरम्यान नव्या मंत्रिमंडळाबाबत उत्सुकता लागली असून मुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज बेळगावमधील विजयी आमदारांनी बेंगळुरूकडे प्रयाण केले असून यादरम्यान प्रसारमाध्यमांनी आमदार लक्ष्मण सवदी यांना मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना लक्ष्मण सवदी म्हणाले, हे एक किंवा दोघांचे मत नसून १३५ आमदारांचे मत आहे. सर्वांची मते जाणून घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन हायकमांड निर्णय घेईल, हायकमांडच्या निर्णयाशी प्रत्येकजण बांधील असतील, अशी प्रतिक्रिया सवदींनी दिली.

सिध्दरामय्यांनी नुकत्याच केलेल्या भाषणाप्रमाणे काँग्रेस पक्षातील कार्यकर्तेच ज्येष्ठ असून मतदारांचे आशीर्वादच विजयला कारणीभूत असल्याचेही ते म्हणाले.

रमेश जारकीहोळी यांनी केलेल्या टीकेला लक्ष्मण सवदी यांनी प्रत्त्युत्तर देखील दिले. यावेळी, पक्षसंघटना हा आपला स्वभाव असल्याचे सांगत जगदीश शेट्टर यांच्या पराभवाला पैशाचे राजकारण कारणीभूत असल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसने जनतेचा विश्वास कमावून निवडणूक जिंकली आहे.

त्यामुळे पुढील काळात जनतेचा विश्वास अबाधित राखण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचेही ते म्हणाले. संपूर्ण राज्यात स्वबळावर काँग्रेसचे सरकार स्थापन होत असून पुढील पाच वर्षे जनतेसाठी चांगले काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.