Thursday, December 26, 2024

/

डिपॉझिट वाचविण्यासाठी आवश्यक आहेत ‘इतकी’ मते

 belgaum

देशातील लोकप्रतिनिधी अधिनियम कायदा 1951 च्या कलम 158 नुसार कोणतीही विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे 10 हजार रुपयांचे (मागास जाती -जमातींसाठी ही रक्कम अर्धी असते) डिपॉझिट अर्थात अनामत रक्कम भरावी लागते.

निवडणूक आयोग ही रक्कम सुरक्षा ठेव म्हणून आपल्याकडे जमा करून घेते. नियमानुसार एकूण मतदानापेक्षा एखाद्या उमेदवाराला 1/6 पेक्षा कमी मते मिळाली असतील तर त्याचे किंवा तिचे डिपॉझिट अर्थात सुरक्षा ठेव आयोगाकडून जप्त केली जाते.

बेळगावच्या विधानसभा मतदार संघाचा विचार केल्यास रिंगणातील उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचविण्यासाठी पुढील प्रमाणे मते मिळवावी लागणार आहेत. बेळगाव उत्तर मतदारसंघात एकूण 59.53 टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणच्या 248525 मतदारांपैकी 149338 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे येथील उमेदवारांना डिपॉझिटची जप्ती टाळण्यासाठी किमान 24890 मते पडणे आवश्यक आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघात एकूण 63.4 टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणच्या 245324 मतदारांपैकी 157788 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे येथील उमेदवारांना डिपॉझिटची जप्ती टाळण्यासाठी किमान 26298 मते पडणे आवश्यक आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात एकूण 78.7 टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणच्या 253678 मतदारांपैकी 203241 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे येथील उमेदवारांना डिपॉझिटची जप्ती टाळण्यासाठी किमान 33874 मते पडणे आवश्यक आहे.

बेळगाव जिल्ह्याच्या 18 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना त्यांचे डिपॉझिट वाचण्यासाठी आवश्यक असणारी मतं संख्या पुढील प्रमाणे आहे. निपाणी : एकूण मतदान 187317, आवश्यक मते 31220. चिक्कोडी -सदलगा : एकूण मतदान 182530, आवश्यक मते 30422. अथणी : एकूण मतदान 190910, आवश्यक मते 31818. कागवाड : एकूण मतदान 160889, आवश्यक मते 26815. कुडची : एकूण मतदान 148908, आवश्यक मते 24818. रायबाग : एकूण मतदान 164273, आवश्यक मते 27379. हुक्केरी : एकूण मतदान 167183, आवश्यक मते 27864. अरभावी : एकूण मतदान 189749, आवश्यक मते 31625. गोकाक : एकूण मतदान 188653, आवश्यक मते 31442. यमकनमर्डी : एकूण मतदान 165932, आवश्यक मते 27655. बेळगाव उत्तर : एकूण मतदान 149338, आवश्यक मते 24890. बेळगाव दक्षिण : एकूण मतदान 157788, आवश्यक मते 26298. बेळगाव ग्रामीण : एकूण मतदान 203241, आवश्यक मते 33874. खानापूर : एकूण मतदान 160093, आवश्यक मते 26682. कित्तूर : एकूण मतदान 154977, आवश्यक मते 25830. बैलहोंगल : एकूण मतदान 150654, आवश्यक मते 25109. सौंदत्ती -यल्लमा : एकूण मतदान 161827, आवश्यक मते 26971. रामदुर्ग : एकूण मतदान 153106, आवश्यक मते 25518.

निवडणूक रिंगणातील उमेदवाराला त्याचे डिपॉझिट अर्थात अनामत रक्कम परत मिळू शकते. मात्र त्याला एकूण अधिकृत मतांच्या तुलनेत एक शष्ठांश (1/6) पेक्षा अधिक मते पडावयास हवीत. ज्या उमेदवाराला एकूण अधिकृत मतांच्या तुलनेत 1/6 रिक्षा जास्त मते पडलेली असतील त्यांना त्यांचे डिपॉझिट निवडणूक आयोगाकडून रीतसर परत केले जाते.

जर एखाद्या उमेदवाराला अधिकृत मतांच्या तुलनेत अगदी बरोबर 1/6 इतकीच मते पडली असतील तर त्याला मात्र डिपॉझिट परत दिले जात नाही. याखेरीज 1/6 पेक्षा कमी मते पडून देखील एखादा उमेदवार निवडून आला तर मात्र त्याचे डिपॉझिट त्याला परत केले जाते. त्यामुळे आता एकंदर बेळगावसह बेळगाव जिल्ह्यातील किती उमेदवार आपले डिपॉझिट वाचवू शकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.