बेळगाव लाईव्ह : हेमू कलानी चौकात ऑन ड्युटी,मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पोलीस कर्मचारी आणि नागरिकांचा वादावादीचा प्रसंग घडल्याचे समोर आले आहे.
ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला जमलेल्या नागरिकांनी जाब विचारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला असून या पोलीस कर्मचाऱ्याला नागरिकांनी जाब विचारताच त्याने तेथून काढता पाय घेतल्याचेही दिसून येत आहे.
सदर पोलीस कर्मचारी इतका मद्यधुंद अवस्थेत होता कि त्याला नागरिकांशी नीट बोलणे आणि स्वतःचा तोल सांभाळून चालणेही कठीण झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात मद्यपान केलेल्या पोलिसाचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांकडून मदतीची काय अपेक्षा करावी असा प्रश्न नागरीकातून उपस्थित होत आहे.
एका बाजूला पोलीस विभागाची प्रतिमा सुधारण्यासाठी आणि पोलीस विभागाला अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या जिल्हा पोलीस प्रमुखांचे प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने नजरेला येणारे पोलीस कर्मचारी यामुळे पोलीस प्रशासनाकडून नागरिकांनी कोणती अपेक्षा ठेवावी? असा प्रश्नp उपस्थित होत आहे.