बेळगाव लाईव्ह : काँग्रेस सरकारने सत्तेवर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी परवानगी देणारा आदेश जारी केला असून १ ते १५ जूनपर्यंत बदली करण्याची सूचना करण्यात आली आहे. बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी आता बदलीला मुहूर्त मिळाला आहे.
प्रामुख्याने शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदलीची जबाबदारी पूर्णपणे संबंधित विभागीय मंत्र्यांकडे सोपविली आहे. सरकारी वर्ष २०२३-२४ मध्ये होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली आहेत.
मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून, दरवर्षी मे आणि जूनमध्ये बदल्या केल्या जाऊ शकतात. गट-अ, गट-ब, गट-क आणि गट ड श्रेणीतील अधिकारी/ कर्मचाऱ्यांयांना वर्षभरासाठी लागू असलेल्या सेवाज्येष्ठता युनिटमधील कार्यबलाच्या सहा टक्क्यांपेक्षा जास्त नसलेल्या सर्वसाधारण बदलीसाठी संबंधित विभागीय मंत्र्यांना अधिकार सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित मंत्र्यांना अधिकार श्रेणीतील अधिकारी/ गट-अ, गट-ब, गट-क आणि गट-ड कर्मचाऱ्यांना २०२३-२४ साठी लागू असलेल्या ज्येष्ठता युनिटमध्ये कार्यरत संवर्ग संख्या सहा टक्क्यांच्या मर्यादेत एक जून ते १५ जूनपर्यंत आदेशामध्ये नमूद केलेल्या अटींच्या अधीन राहून खात्याच्या मंत्र्यांना सार्वत्रिक बदली करण्यासाठी अधिकार दिले आहेत.
सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी यापूर्वीच वाढ केली आहे. आता बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील दिलासा मिळाला असून येत्या पंधरवड्यात बदली प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.